जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे :- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल 6 एकर (2.4 हेक्टर) जागेत पसरले आहे. हे धर्मादाय, बहु-विशेष रुग्णालय आहे.
जागेची माहिती
सदरील रुग्णालय 6 एकर (2.4 हेक्टर) जागेत पसरले आहे.
या हॉस्पिटलमध्ये 900 पेक्षा जास्त खाटे आहेत.
हे रुग्णालय पुण्याच्या मध्यभागी आहे.
इतर माहिती
या हॉस्पिटलची स्थापना मंगेशकर कुटुंबाने ऑक्टोबर 1989 मध्ये केली होती.
या हॉस्पिटलचे ध्येय कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा देणे हे आहे.
हे रुग्णालय आणि संशोधन केंद्र एरंडवणे, पुण्यात आहे.
हे रुग्णालय धर्मादाय, बहु-विशेष रुग्णालय आहे.
गेल्या दोन दिवसांपासुन गाजत असलेले पुण्याचे दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल येथील घडलेल्या प्रकरणामुळे पुन्हा पुन्हा मी इतिहासामधे जात आहे ..
पुन्हा इतिहासामधे जाऊन “पूर्वी घेतला गेलेला चुकीचा निर्णय, पुन्हा सुधारता येऊ शकला असता तर ?”हा विचार मला भयंकर त्रास देतोय असे वक्तव्य मुळ जागामालक यांनी केले आहे.
दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलच्या जागेसोबत आमच्या लहानपणच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत, एक भावनीक नातं आहे त्या जागे सोबत, माझ्या घरच्या सर्वांचच. ती 6 एकर जागा आणी त्याच्या बाजूच्या हिमाली आणी संकुल सोसायटी हा पूर्णं पट्टा आमची ( खिलारे कुटुंबाची) शेती होती. आमचे काका श्री.अमृतराव व कै.काशिश्वर खिलारे हे तीथे शेती करत होते त्यांनीही या प्रस्तावास लगेच मान्यता दिली.
हिमाली आणी संकुल बांधकाम चालू होणार होत, मधला 6 एकर पट्टा मोकळाच होता.
मा.शरद पवार, मा. विलासराव देशमुख हे
माझे वडिल पुण्याचे माजी महापौर दि.ज.खिलारे यांचे मित्र होते. त्यांचे नेहमीच घरी येण जाण होत.
लता मंगेशकर या पुणे शहरामधे हाॅस्पीटलसाठी जागा शोधत होत्या. तशी ईच्छा त्यांनी शरद पवारांना बोलून दाखवली.
या सर्व गोष्टींची मी आणी सर्वं खिलारे परिवार साक्षीदार आहोत – शरद पवार यांचा भाऊंना फोन आला की… खिलारे साहेब कर्वेरोड डेक्कन काॅर्नर ते पौडफाट्याच्या पुढेपर्यंत सर्व तुमच्या मालकीच्या जागा आहेत. गरवारे काॅलेज, नळस्टाॅपचं चर्च, महिलाश्रम च्या जवळपास 15 एकर जागा तुमच्या वडिलांनी (जयसिंगराव खिलारे) यांनी ती विना मोबदला दिली आहे आणि लतादिदी धर्मादाय हाॅस्पिटलसाठी जागेच्या शोधात आहेत, एरंडवण्यामधे तुमची शेती आहे त्यातला 6 एकर जागेचा पट्टा दिदींना धर्मादाय हाॅस्पीटल साठी द्यावा. शरद पवारांनी ही विनंती करतानाच जाता जाता एक गोष्ट कानावर घातली जी हसत हसत धमकी होती की खिलारे साहेब कर्वेरोडच्या अर्ध्या जमिनींचे मालक तुम्ही आहात, पण सिलींगचा कायदा आलेला आहे जमिनी सिलींगमधे जातील त्यापेक्षा धर्मादाय हाॅस्पीटलसाठी ती जागा द्यावी. ही विनंती वजा धमकी होती.
गरवारे काॅलेज, महिलाश्रम, चर्च अशा कितीतरी जागा सिलींगचा कायदा नसताना आमच्या खिलारे परिवाराने दान केल्या होत्या हे पवारसाहेब विसरले होते…. लता मंगेशकराना दिलेली जागा तर फक्त 6 एकर होती.
माझ्या आत्याचे आणी मोठ्या बहिणीचे सासरे मा.आमदार नामदेवराव मते, माझ्या लहान बहिणीचे सासरे मा.खासदार विठ्ठलराव तुपे यांनी पुन्हा पुन्हा सांगीतल की… भाऊसाहेब, तुम्ही खिलारे कुटुंबाने स्वतः तीथे काॅलेज किंवा हाॅस्पिटल बांधा..
पण आमच्या खिलारे कुटुंबातील सर्वांनी आज्जी आजोबा, काका, आई, काकू, आत्या, आम्ही बहिण भावांसोबत ती जागा द्यावी की नाही याबद्दल चर्चा होऊन सर्वसंमतीने ही जागा विनामोबदला देण्याचे ठरले होते आणी तसा शब्द शरदरावांना दिला गेला होता. त्यामुळे रोज कोणाचे ना कोणाचे घरी फोन यायचे एवढी मोठी सोन्यासारखी जागा नका देऊ मंगेशकरांना. धर्मादायी हाॅस्पिटलच्या नावाने आज तुम्ही जागा द्याल पण भविष्यात तीथे पैशांचा कारखाना सुरू होईल आणी तीच भविष्यवाणी नंतर वेळोवेळी अनुभवात आली..
खिलारे यांचे नाव हाॅस्पीटलला द्यावे किंवा एक पूर्णं मजला तुमच्या कुटुंबासाठी नेहमी रिझर्व ठेवावा असही बरेच जणांनी सुचवल होत. पण दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलच्या सुरवाती पासुन शेवट पर्यंतच्या 6 एकर परीसरातील अगदी एखाद्या फरशीवरही आम्ही खिलारेंच नाव लावून घेतल नाही परंतू गोर गरीब पेशंटला ट्रिटमेंट वरती 30% सुट देण्यात यावी ही ईच्छा आम्ही बोलून दाखवली होती.
आणी याच गोष्टीमुळे मनापासुन वाईट वाटत जेव्हा या वास्तूमधे पुन्हा पुन्हा पैशांसाठी उपचारांअभावी रूग्णांचे बळी जातात आणी ईथे रूग्णांकडून अवाच्यासवा दर आकारले जातात.
ह्रद्यनाथ, लतादिदी, आशादिदी, शरदकाका सर्वंजणांशी आमचे मैत्रीचे संमंध आहेत, या जागेची बोलणी चालू असताना हे सर्वंजण आमच्या घरी येत जात असत आणी तासनतास चर्चा चालत असे..
माझी बहिण वर्षा तुपे हिच्या लग्नामधे 30 एप्रील 1989 मधे जवळपास 20 हजार लोकांच्या साक्षीने कलश स्वरूपात ही जागा मंगेशकर कुटुंबियांना दिली गेली होती.
हाॅस्पीटल बांधल गेल, आणी काही वर्षातच हाॅस्पीटल मॅनेजमेंट ज्ञानपिरबोधनीचे डाॅ.केळकर यांच्या हातात गेल…
या जागेचे मूळ मालक खिलारे कुटुंबातील माजी महापौर खिलारे यांची बायपास सर्जरी साठी लाखो रूपये बील आकारल गेल, तेही आम्ही समजू शकतो की जो तो ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वागतो परंतू बीलामध्ये डाॅ धनंजय केळकरांनी स्वतःचे व्हीजीट चार्जेस 600 रूपये लावले होते. जेव्हा की ती पेशंट व्हीजीट नव्हती तर ज्या माणसाने कोट्यावधींची जागा तुम्हाला दान केली त्या माणसाला भेटायला ते आले होते.
“मूळ मालक आम्ही आहोत बील देणार नाही किंवा बिल कमी करा” ही दादागीरी, माज किंवा क्षृद्रपणा खिलारे कुटुंबाने दाखवला नाही. धनंजय केळकरांनी लावलेल स्वतःचे 600रू व्हिजीट चार्जेस यालाही आम्ही हसण्यावारी नेल..
त्या घडलेल्या प्रत्येक घटनेचे आम्ही खिलारे परीवारातील सदस्य साक्षीदार आहोत आणी आता याची खंत वाटते की विना मोबदला दिल्या गेलेल्या जागेचा वापर पैसा कमविण्यासाठी केला जात असताना जेव्हा ईथे कोणाचा नाहक बळी जातो – हे मात्र आम्ही हसण्यावारी नेऊ शकत नाही.. तसेच हे कोठेतरी थांबले पाहिजे धर्मादाय हॉस्पीटल्स म्हणजे दलालांचा अड्डा झाली आहेत येथे गरीबांना कोणीच वाली राहिला नाही अशी हॉस्पीटल्स म्हणजे शासनाकडून फायदा घेऊन आलेल्या प्रत्येक रुग्णांना फक्त धर्मादायच्या नावानं येथे लुटले जातं.
दिनानाथ मंगेशकर हाॅस्पीटलमधे धर्मादायच्या नावाखाली चाललेली लुबाडणूक आणी पैशांअभावी पेशंटच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या मंगेशकर हाॅस्पीटल प्रशासनाचा आम्ही मूळ मालक म्हणून खिलारे परिवार नीषेध व्यक्त करतो.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह