मंत्री शंभूराजे देसाईंच्या प्रमुख उपस्थितीत ; खंडाळा परिसरातील असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

सातारा :- (दि.५)सातारा येथील विश्रामगृहात कॅबिनेट मंत्री तथा सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी संपर्कप्रमुख शरद कणसे , सहसंपर्कप्रमुख एकनाथ दादा मुंबई जिल्हाप्रमुख चंद्रकांत दादा जाधव , युवा सेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले , शिवसेना वाई विधानसभा संघटक संजय देशमुख तसेच तालुकाप्रमुख भूषण शिंदे , संघटक सचिन आवारे यांच्या उपस्थितीत शिरवळ शहरातील शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आलेले विजय गिरे माजी शहरप्रमुख , मंदार वेदपाठक युवा सेना शहरप्रमुख , धर्मराज तळेकर विभाग प्रमुख जिल्हा परिषद गट व प्रताप जगताप आणि अशा असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश यावेळी पार पडले तसेच त्यांचा सत्कार पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आला .

यावेळी बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले की, येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत या झालेल्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे ) गटाला अधिकचे बळ मिळणार आहे व या परिसरात पक्षाची ताकत अधिक वाढणार आहे त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने संपूर्ण खंडाळा तालुक्यात पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करावेत जेणेकरून पक्षाची ताकत काय असते हे संपूर्ण सातारा जिल्हयाला पहावयास मिळणार आहे.

शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) विस्तारासाठी खंडाळा तालुका तसेच शिरवळ शहरामध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे व या झालेल्या पक्षप्रवेशाने पक्षाला मोठी  ताकद मिळणार असून सदरचे पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी विधानसभा संघटक संजयसिंह देशमुख यांच्याकडून विशेष असे प्रयत्न करण्यात आले आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai