अजित पवारांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याचा उच्चांकी हंगाम, सभासदांना मोठा फायदा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
बारामती, ता.११ : बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या नेतृत्वाखालील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामात विक्रमी गाळपाची नोंद केली आहे. या हंगामात कारखान्याने एकूण ११,२१,०७६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून, ११.८४८ टक्के रिकव्हरी मिळाली आहे. या गाळपातून एकूण १२,००,६०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीत ऊसदर जाहीर करताना सांगण्यात आले की, सभासदांचा ऊस ३४५० रुपये प्रति मेट्रिक टन दराने तर गेटकेन गाळप केलेल्या ऊसास ३२०० रुपये प्रति मेट्रिक टन या दराने अंतिम भाव देण्यात येणार आहे. याशिवाय, व्हरायटी ऊसाला १०० रुपये अनुदान आणि खोडवा अनुदान १५० रुपये प्रति मेट्रिक टन असे एकूण ३६०० रुपये प्रति मेट्रिक टन दराने सभासदांना ऊसदर देण्यात येणार आहे.
कारखान्याची एफ.आर.पी. ३९८८.६४ रुपये असून, त्यातून तोडणी व वाहतूक खर्च ८६३.६४ रुपये वजा जाता निव्वळ एफ.आर.पी. ३१२५ रुपये प्रति मेट्रिक टन येते. सभासदांना पहिल्या हप्त्यात ३१३२ रुपये प्रति मेट्रिक टन आणि खोडकी खर्च २०० रुपये प्रति मेट्रिक टन, अशा एकूण ३३३२ रुपये प्रति मेट्रिक टन रक्कम आधीच अदा करण्यात आली आहे. गेट केन धारकांना ३१२५ रुपये प्रति मेट्रिक टन देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम—सभासदांना ११८ रुपये, तर गेटकेन धारकांना ७५ रुपये प्रति मेट्रिक टन—१४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अदा करण्यात येईल.
याशिवाय, कारखान्याने आपल्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस जाहीर केला आहे. तसेच सभासदांच्या ठेवींवरील व्याज रक्कम ३ कोटी ५८ लाख ४८ हजार १४९ रुपये नुकतीच त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
पुढील २०२५-२६ गाळप  हंगामासाठी कारखान्याची सर्व तयारी सुरू असून, गळीत हंगाम वेळेत सुरू व्हावा यासाठी विविध विभागांमध्ये कामे वेगाने सुरू आहेत. चेअरमन अजित पवार यांनी या वर्षीचे पर्जन्यमान समाधानकारक असल्याने अधिकाधिक ऊस गाळपाचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे व्यवस्थापन, सभासद, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे कारखान्याचे व्यवस्थापन, सभासद, तोडणी वाहतुकदार, अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित प्रयत्न असल्याचे संचालक मंडळाने नमूद केले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!