“नराधमाचा थरार उघड! अत्याचार लपवण्यासाठी बेकायदेशीर गर्भपात; फलटणच्या डॉक्टरला बेड्या”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
बारामती (ता.६): बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिस तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे. पीडितेवरील अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी फलटण येथील एका खाजगी डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप होता. या घटनेनंतर पीडिता गर्भवती राहिल्याची माहिती पुढे आली. प्रकरण दडपण्यासाठी आरोपीने तिला बाहेरगावी नेऊन बेकायदेशीर गर्भपात घडवून आणला.
दरम्यान, संबंधित प्रकाराची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवून तांत्रिक व वैद्यकीय पुरावे गोळा केले असता, फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात नियमबाह्य पद्धतीने गर्भपात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संबंधित डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीचा यापूर्वीच मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, पोलिसांनी तपास सुरू ठेवत इतर संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो कायदा आणि वैद्यकीय गर्भपात (MTP) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामागील इतर बाबींचाही सखोल तपास सुरू आहे.
जनसंघर्ष भूमिका: अल्पवयीनांवरील अत्याचार आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचे प्रकार ही गंभीर सामाजिक व कायदेशीर समस्या आहे. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईसह जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे, अशी जनतेतून तीव्र मागणी व्यक्त होत आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!