सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे संगिता वानखडे अडचणीत : भोसरी पोलीस ठाण्यात कलम 356 अंतर्गत गुन्हा दाखल.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, ता. ७ – सोशल मीडियावर मराठा समाज व मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तथागतीत समाज सेविका संगिता रविंद्र वानखेडे (रा. भोसरी एमआयडीसी) यांच्याविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रार सतीष भास्कर काळे (वय ४९, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) यांनी दाखल केली. तेथील सागर इलेक्ट्रिक नावाचे दुकान चालवतात तसेच ते सभाजी ब्रिगेड संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत.
तक्रारीनुसार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता युट्यूब व फेसबुकवर अपलोड झालेला एक व्हिडिओ त्यांनी पाहिला. त्या व्हिडिओमध्ये संगिता वानखेडे यांनी “मराठा समाजातील पुरुष आंदोलनासाठी मुंबईत असताना त्यांच्या घरातील स्त्रियांजवळ इतर पुरुष झोपले होते” असे वादग्रस्त विधान केले. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीही अत्यंत खालच्या शब्दांत टीका केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या विधानामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून, समाजाची बदनामी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओची लिंक फेसबुकवर व्हायरल झाली असून, मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे. तक्रारदार काळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात “वानखेडे यांनी यापूर्वीही वारंवार मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले आहेत” असा आरोप केला आहे.
या संदर्भात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनसीआर क्र. १३६९/२०२५ कलम ३५६(२), भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत नोंद करण्यात आली. पोलिसांनी तक्रारदारास हा असंज्ञेय गुन्हा असल्याने न्यायालयीन दाद मागण्याची समज दिली आहे.
या घटनेमुळे मराठा समाजात संताप व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेला ऊत आला आहे. समाजातील कार्यकर्ते व आंदोलक याप्रकरणी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून, हे प्रकरण न्यायालयात नेण्याची तयारी सुरू करण्यात आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool