कोंढाळकर खून प्रकरणातील संशयीत,अजय शिंदेची आत्महत्या पोलिसांच्या मारहाणीमुळचं ; कुटूंबीयांकडून गंभीर आरोप.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

भोर- (दि.18)भोर तालुक्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.न्हावी गावातील अजय तुकाराम शिंदे (वय- 22 वर्ष) नामक तरुणाने शिरवळ पोलिसांच्या केलेल्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप त्याच्या कुटूंबीयांनी केला आहे.

मागील काही दिवसांमध्ये शिरवळ येथील एमआयडीसी परिसरामध्ये बुधवार रोजी रात्री साडेआकरा वाजताच्या दरम्यान सीपी कंपनीच्या गेटजवळ अमर शांताराम कोंढाळकर (वय-22 वर्षे ) राहणार वडवाडी, तालुका खंडाळा येथील युवकाची अत्यंत निघृणपणे तलवारीच्या सहाय्याने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात तेजस महेंद्र निगडे (वय-19 वर्षे ) राहणार गुणंद, तालुका-भोर या युवकास शिरवळ पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने तेजस याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, पुढील चौकशी साठी त्याची 3 दिवसांची पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली होती. सदरच्या घटनेचा अधिकचा तपास शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप हे करीत आहेत.

सदरील हत्येच्या पार्श्वभुमीवर, आरोपी सोबत कंपनीमध्ये काम करत आसणाऱ्या इतर व्यक्तींची देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. या चौकशी दरम्यान अजय शिंदे याला सुद्धा शिरवळ पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सोमवार (दि.17) रोजी अजय शिंदे हा आपल्या कुटुंबासोबत शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला होता.

शिरवळ पोलिसांकडून त्यास चौकशीसाठी ताब्यात घेऊन जबर मारहाण केली. सदरील मारहाणीनंतर त्याचे हात आणि पाय सुजले होते. संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्याला पोलिसांनी सोडले होते त्यानंतर अधिकच्या चौकशीसाठी दि.18 रोजी पुन्हा त्याला  बोलवण्यात आले होते. परंतू पुन्हा आपल्ययाला मारहाण होईल या भीतीनेचं अजय या युवकानं आपल्या न्हावी गावातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तसेच पोलिसांच्या दबावामुळचं अजयनं आत्महत्या केल्याचा गंभीर असा आरोप कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांवर करण्यात आला आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai