जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः – पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,घरगुती वादातून अंगावर धावून आलेल्या चुलत भावाला ढकलून दिल्याने त्याचा बाल्कनीमधून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. परंतू झालेली घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं. याप्रकरणात नांदेड सिटी पोलिसांकडून घटनेच्या दुसऱ्या दिवशी या प्रकरणाची घटनास्थळी जाऊन चौकशी केली व त्याच्या चुलत असणाऱ्या भावाला अटक करण्यात आली.
सदरील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव अमर किसन देशमुख ( वय ३५) आहे तो कपिल अपार्टमेंट, मते नगर, धायरी गाव येथील राहणारा आहे. राजू भुरे लाल देशमुख कपिल अपार्टमेंट, मते नगर, धायरी गाव असे आरोपी चुलत भावाचे नाव असून, त्याला पोलिसांकडून या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोह पत हरी राम सहारे ( वय ३६ वर्षे) धायरी गाव यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात सदरच्या आरोपी विरुद्ध फिर्याद दिली आहे. सदरील घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ : ४५ वाजताच्या दरम्यान धायरी गावामध्ये घडली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमर तसेच त्याचा चुलत असणारा भाऊ राजू देशमुख व इतर दोघेजण मूळचे मध्यप्रदेश येथील आहेत. तसेच ते एका सोन पापडी तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये काम करत होते. राजू देशमुख आणि अमर देशमुख या दोघांमध्ये आपल्या पत्नी वरून बोलण्या कारणानं दोघांमध्ये वाद सुरू झाल्यानं अमर देशमुख राजू देशमुखच्या अंगावरती धाऊन गेल्यानं. त्याचवेळी राजू देशमुख ने अमर देशमुख याला बाल्कनी मधून खाली ढकलून दिल्यानं तो खाली पडला. त्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची मदत न करताच राजू देशमुख आपल्या घरामध्ये तसाच निघून गेला.
सदरील घडलेला प्रकार मोहपत सहारे याने पाहिला होता . तसेच घटनेच्या दुसऱ्या दिवशी अमर देशमुखचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेचा तपास केल्यावर राजू देशमुखनं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यामुळे त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यानं राजू देशमुख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे करत आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह