शिरवळ येथे केदारेश्वर तरूण मंडळाच्या वतीने ; शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

शिरवळ :- (दि.१९) खंडाळा तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या असणाऱ्या शिरवळनगरीमध्ये बुधवार (दि.१९ ) रोजी संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीचे औचित्य साधून केदारेश्वर तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सर्वात प्रथम किल्ले सिंहगड वरून सकाळी आठ वाजताच्या दरम्यान शिरवळमध्ये शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान छत्रपतींच्या  शिवमूर्तीस जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर छत्रपतींच्या शिवमुर्तीचे पुजन, सांजमहाआरती , ध्येयमंत्र , शिवप्रेरणा मंत्र , व शिवजयघोष हा सर्व शिवप्रेमिंकडून यावेळी करण्यात आला. त्यानंतर केदारेश्वर तरुण मंडळाच्या वतीने प्रसाद म्हणून जिलेबीचे वाटप करण्यात आले. यानंतर नुकतेच ग्रामपंचायत शिरवळचे नवनिर्वाचित उपसरपंच म्हणून निवड झालेले श्री अमोल कबुले यांचा नागरी सत्कार केदारेश्वर तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आला.

नवनिर्वाचित उपसरपंच अमोल कबुले यांचा नागरी सत्कार करतेवेळी जिल्हा परिषद सातारा मा. अध्यक्ष उदयदादा कबुले

या शिवजयंती मोहत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे आर के साऊंड सिस्टीम व लेजर लाईट शो होता तसेच या कार्यक्रमावेळी तोफा व फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतिषबाजी मंडळाच्या वतीने करण्यात आल्यानं संपूर्ण परिसर उजळून निघाला होता व छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वीतलावर प्रत्यक्षात जणूकाही अवतरले आहेत असा भासच यावेळी प्रत्ययक्षदर्शींना होत होता.

या शिवजयंती मोहत्सवासाठी मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा सातारा जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष उदयदादा कबुले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मंडळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि शिरवळनगरीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai