बारामती येथे वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या ; चार विद्यार्थ्यांचा भिगवनकडे जाताना , भिषण असा अपघात.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर :-  बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारे ४ विद्यार्थी बारामती येथून भिगवनच्या दिशेने फोर व्हीलर गाडी हॅरीहर क्र. बीआर.०३. एएम ९९९३ यामधून जात असताना,चालकाचे गाडीवरचं नियंत्रण सुटून फोर व्हीलर गाडीचा भिषण असा अपघात झाला यात दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दशू शर्मा वय.२१ वर्ष राहणार दिल्ली आणि आदित्य कणसे (वय २९ वर्षे ) राहणार मुंबई असी मृतांची नांवे आहेत.तर कृष्णा मंगल सिंग ( वय २१ वर्षे ) राहणार बिहार आणि महिला पायलट चेष्टा बिश्नोई (वय २१ वर्षे ) मूळ राहणार दिल्ली हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जैनकवाडी जवळील लामजेवाडी येथे अपघात झाला आहे.

बारामती भिगवण मार्गावर आसणाऱ्या लामजेवाडी या गावाजवळ आज पहाटेच्या ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.टाटा हॅरिअर वाहनावरचे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण असा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे तसेच हे चारही जण बारामती – भिगवन रोडने निघाले होते.अपघात झाल्याचे समजताच भिगवन पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच खाजगी रुग्नवाहिका चालक केतन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना पुढील उपचारासाठी भिगवन येथील खाजगी रुग्नालयात नेहण्यात आले आहे.यात महाराष्ट्र राज्यातील १ पायलट असून बिहार राज्यातील १ पायलट आणि राजस्थान मधील एका युवतीचा यामध्ये समावेश आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें