मारकडवाडीत प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश ; बॅलेट पेपरवर मतदान घेता येणार नाही.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

सोलापूर :- मंगळवार दि. ३ डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका मारकडवाडीतील ग्रामस्थांनी घेतली होती. व याच निवेदन हे प्रशासनाला दिली यानंतर प्रशासनाकडून परवानगी नाकारून या गावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबवल्यास सदरील नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून आता देण्यात आला आहे.

माळशिरसच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर यांनी तसे आदेश जाहीर केले आहेत. भारतीय न्याय संहितेचे कलम 163 नुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जर आदेशाचे भंग करून मतदान प्रक्रिया राबविली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मारकडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरुप

बॅलेट पेपरवर उद्या मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतलेल्या माळशिरस तालुकयातील मारकडवाडी गावाला आता पोलीस छावणीचे स्वरुप आलं आहे. मात्र मतदान प्रक्रिया राबवू नये यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकण्यात आला होता. प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली. आता जमावबंदी च्या पार्श्वभूमीवर मारकडवाडी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाल्याने परिस्थिती काहीशी तणावाची बनली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत. यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला. यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना या आधी देण्यात आले आहे. पण प्रशासनाने त्याला नकार दिला आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai