जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
शिरवळ (ता. खंडाळा जि.सातारा ) येथे संयुक्त व्याख्यान मंडळ, यांच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ३७ व्या संयुक्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले होते. शिरवळ गावचे आद्य सरपंच कै. पांडुरंग भाऊ तांबे यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात येऊन कार्यक्रमाच प्रारंभ झाला, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेंद्र अण्णा तांबे व्हाइस चेअरमन खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना खंडाळा हे होते त्याच बरोबर या संयुक्त व्याख्यान मंडळाचे , शिरवळचे अध्यक्ष – सुनिल मळेकर , उपाध्यक्ष – शिवाजीराव देशमुख, कार्याध्यक्ष- ॲड. बाळकृष्ण पंडीत, मार्गदर्शक – रमेश देशपांडे , सामाजिक कार्यकर्ते – ईश्वर भाई जोशी , सचिव – फिरोज पठाण , खजिनदार – चंद्रकांत भरगुडे , आणि सहसचिव – महेश घाडगे या कार्यक्रम प्रसंगी उपस्थीत होते.
रविवार दि.१ डिसेंबर रोजी संध्याकाळी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पहिल्या पुष्पाचे व्याख्यान हे मा. अर्चना भोर – करंडे (प्रसिद्ध व्याख्यात्या, पुणे ) यांचं झालं. यामध्ये व्याख्यानाचा विषय होता , इतिहासातील मर्दानी स्त्रियांचे कर्तृत्व आणि आजचे वास्तव हा विषय घेऊन त्यांनी इतिहासातील राजमाता जिजाऊ माँसाहेब , तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले तसेच इतिहासातील इतर स्त्रियांनी त्या काळात कोण कोणते पराक्रम केले याची आपल्या सुमधूर वाणीतून खुप सुंदर असं विश्लेषण करून श्रोत्यांची मनं त्यांनी जिंकली , व श्रोत्यांकडून टाळ्यांच्या गडगडात वाहवाह मिळवली . त्यांच्या व्याख्यानानंतर लक्षवेधी ठरलं ते त्यांच्या अवघ्या ५ वर्षीय मुद्रा हिच भाषण तिने सुद्धा आपल्या सुमधूर वाणीनं राजमता जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्यकतृत्वचा इतिहास मांडला त्यामुळे तिचं ही श्रोत्यांकडून टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं व तिचा सत्कार हा प्रमुख पाहुणे राजेंद्र आण्णा तांबे यांच्या शुभहस्ते करून तीला यावेळी गौरवण्यात आले.
तसेच हया व्याख्यानमालेचा कार्यक्रम पुढील ७ डिसेंबर पर्यंत रोज संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत चालणार आसून त्यामध्ये दि.२ डिसेंबर रोजी मा. श्वेता शिंदे (प्रसिद्ध अभिनेत्री लागिरं झालं जी फेम) यांचं महिला सक्षमीकरण या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच दि. ३ डिसेंबर रोजी मा. श्री. सुहास किर्लोसकर प्रसिद्ध व्याख्याते व संगीत तज्ञ, विश्लेषक , पुणे यांचं गाता रहे मेरा दिल या विषयावरती व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दि.४ डिसेंबर रोजी मा. डॉ . दत्ता कोहिनकर प्रसिद्ध व्याख्याते , विपश्यना केंद्र प्रमुख , पुणे यांचं मनाची अमर्याद शक्ती आणि तणावमुक्ती या विषयावरती व्याख्यान होणार आहे. तसेच दि. ५ डिसेंबर रोजी मा. उज्वला बर्वे प्रसिद्ध व्याख्यात्या, पुणे यांचं सोशल मिडीयाचे अद्भूत विश्व या विषयावरती व्याख्यान होणार आहे .
तसेच दि. ६ डिसेंबर रोजी मा. राकेश पिंजण सरकार प्रसिद्ध व्याख्याते , पुणे यांचं शंभुराजे तुम्ही होतात म्हणून या विषयावरती व्याख्यान होणार आहे. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. ७ डिसेंबर रोजी मा. प्रदीप निफाडकर प्रसिद्ध व्याख्याते , गझलकार , पुणे यांचं गझल उर्दुतून मराठीकडे या विषयावरती व्याख्यान होऊन व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह