मुख्यमंत्री पदाबाबत कोण ठरणार वरचड ? शिंदे की फडणवीस.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 पुणेः- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्के हुशार राजकारणी ठरलेत. मुख्यमंत्री पदावरुन ते नाराज नाहीत, असे जरी सांगत असले तरी त्यांनी फडणवीसांना ‘एकलंगी डावात’ अडकवलंय. एकलंगी डाव हा कुस्ती मधील एक प्रकार आहे.

२०१४ ते २०१९ व २०२२ ते २०२४ या कालखंडात फडणवीस भाजपा मधील सर्वात ताकदवर नेते राहीले. त्यामागे त्यांच्या ताब्यातील गृह खात्याचा सर्वात मोठा वाटा आहे. अजितदादा पवार गट महायुतीत सहभागी झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व अर्थ दोन्ही महत्त्वाची खाती होती.

फडणवीसांनी तात्काळ अर्थ खाते सोडले. आता शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह कायम ठेवत गृह खात्याची मागणी केलीय. जसा त्याग फडणवीसांनी मागे २०२२ मध्ये केला. तसाच त्याग शिंदेही करायला तयार आहेत. मात्र त्यांना गृह खाते हवेय.

याच कारणासाठी अजूनही दिल्लीच्या भाजपा हायकमांडने मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांचे नाव अजूनही जाहीर केलेले नाही. फडणवीसांचा चेहरा अजूनही जितका खुश हवा तितका दिसत नाही. राज्यातील सत्तेसोबत केंद्रातील सत्ताही महत्त्वाची आहे.

उद्या जर नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी पलटी मारली तर शिंदेंकडेही ७ खासदार आहेत. त्यामुळे शिंदेना आंजारणे गोंजारणे महाशक्तीला अत्यावश्यक आहे. फडणवीसांचे मुख्यमंत्री असणे गृहखात्याशिवाय शेपूट कापलेल्या अवस्थेसारख ठरेल. त्यामुळे मुख्यमंत्री पद की गृहमंत्री पद याचा निर्णय फडणवीसांना घ्यायला लागेल.

विधानसभा निवडणूकीआधी माहिमच्या एका जागेसाठी शिंदेनी राज ठाकरेंना मुंबईतील सर्व उमेदवारांची माघार घेण्याचा प्रस्ताव दिला होता. असा प्रस्ताव केवळ धोरणी राजकारणी ठेवू शकतो. आताही शिंदेनी तेच धोरणी राजकारण केले आहे.

शिंदे गट आहे असा टिकवायचा असेल तर शिंदेना गृहमंत्री पद हवेच. मुख्यमंत्री कोण होणार? याचा तिढा गृहमंत्री पदात अडकलेला आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी गृहमंत्री पद सोडण्यास नकार दिला तर महाशक्ती मुख्यमंत्री म्हणून मराठा चेहरा देवू शकतात. याच कारणामुळे मुख्यमंत्री पदाचे नाव अधिकृतपणे जाहीर होत नाही.

राज्यातील एकाही नेत्याकडे सध्या कसलाही अधिकार नाही. आता सर्वाधिकार ‘महाशक्तीचे आदेश’ आहेत. त्यामुळे धक्कादायक निर्णय होण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी २ डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे मुख्यमंत्री ठरवण्यात किंगमेकरची भूमिका पार पाडतील.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें