Search
Close this search box.

इंदापूरच्या पोलीस निरीक्षकावर,एका वर्षात बेकायदा दोन कोटींची संपत्ती चौकशीत मिळाल्याने ; एसीबीकडून गुन्हा दाखल.!!.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर :- इंदापूर येथील आसणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाने एका वर्षात तब्बल २ कोटी ७ लाख ३१ हजार रुपये कमविल्याचा धक्कादायक प्रकार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आता उघडकीस आणला आहे.त्याच्यावर अपसंपदा बाळगल्याचा गुन्हा एसीबीच्या वतीने दाखल करण्यात आला आहे.

हरिभाऊ नारायण खाडे तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, बीड, राहणार विकास वाडी, पोस्ट रेडणी तालुका इंदापूर, जिल्हा पुणे तसेच त्याची पत्नी मनीषा हरिभाऊ खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांची बीडमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध १६ मे २०२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेची ही उघड चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

परीक्षण कालावधीमध्ये म्हणजे १० ऑगस्ट २०२३ ते १६ मे २०२४) या दरम्यान हरिभाऊ खाडे याने त्याचे सेवा कालावधीतील परिक्षण काळात सर्व ज्ञात व कायदेशीर मार्गाने मिळणार्‍या उत्पन्नापेक्षा २ कोटी ७ लाख ३१ हजार ३५८ रुपये (११६.२८ टक्के) रक्कमेची बेकायदा अपसंपदा संपादित केली आहे. तसेच त्यापैकी त्याची पत्नी मनिषा खाडे हिने सुमारे ६२ लाख ७९ हजार ९५३ रुपयांची मालमत्ता स्वताच्या नावावर धारण करुन हरिभाऊ खाडे याला बेकायदा अपसंपदा संपादित करण्यासाठी सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झालं. त्यामुळे याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघांवर आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!