एग्जीट पोलनुसार , पुणे जिल्हयातील २१ जागांपैकी महायुती की महाविकास आघाडी, कोणाला किती जागा?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 पुणेः गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची व त्यानंतर मतदानाची धामधूम आज अखेर संपली आहे. आज २८८ मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील विविध पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य हे मतपेटीत आज रोजी संध्याकाळी ६ वाजता बंद झाले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी यंदा राज्यभरात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले. २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यापुर्वी ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे  निकाल समोर येत आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत दिसून येत आहेत. (महाराष्ट्र २०२४ एग्जीट पोलच्या अंदाजानुसार ) अशातच खासदारापासून ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पुणे शहराने अनेक पदे आतापर्यंत मिळवली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाचं प्राबल्य अधिकचे दिसत आहे ते जाणून घेऊयात.

२०१९ ला २१ जागांपैकी कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत ?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) -१०
भाजप – ८
काँग्रेस – ३

पुणे शहरात महायुती की महाविकास आघाडी, कोणाला किती जागा मिळतील?

पुणे शहरातील ८ मतदार संघापैकी ४ जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील तर ४ जागा ह्या महायुतीला मिळतील अशी दाट शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील एकूण २१ मतदार संघातील जागांपैकी बोलायचं झाल्यास, ११ जागा ह्या महाविकास आघाडीला जाण्याची दाट शक्यता आहे. तर १० जागा या महायुतीच्या पदरात पडण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघातून कोणते पक्ष जिंकणार ते पुढील प्रमाणे ..

195 – जुन्नर – महाविकास आघाडी
196 – आंबेगाव – महाविकास आघाडी
197 – खेड आळंदी – महाविकास आघाडी
198 – शिरुर – महायुती
199 – दौंड – महाविकास आघाडी
200 – इंदापूर – महाविकास आघाडी
201 – बारामती -महायुती
202 – पुरंदर – महाविकास आघाडी
203 – भोर – महाविकास आघाडी
204 – मावळ – महायुती
205 – चिंचवड -महायुती
206 – पिंपरी -महायुती
207 – भोसरी – महायुती
208 – वडगाव शेरी -महाविकास आघाडी
209 – शिवाजीनगर – महायुती
210 – कोथरुड – महायुती
211 – खडकवासला – महायुती
212 – पार्वती -महायुती
213 – हडपसर -महाविकास आघाडी
214 – पुणे कॅन्टोन्मेंट -महाविकास आघाडी
215 – कसबा पेठ – महाविकास आघाडी

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai