आदर्श आचारसंहितेला बगल देत पुण्यात छुपेपणाने उमेदवारांकडून,सांकेतिक भाषेतील टॅगलाईनचा वापर करत ; बॅनरबाजीद्वारे हायटेक प्रचार..!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

 पुणेः– विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा हया सोमवार दि. १८ रोजी संध्याकाळी ६ वाजता थंडावल्या आहेत. त्यानंतर उमेदवारांकडून जाहीर प्रचार बंद करण्यात आला. मात्र प्रचाराची मुदत संपल्यानंतर सुद्धा छुपा प्रचार करण्यात येत आहे.पुण्यात उघडपणेच छुपा प्रचार सुरू असल्याचे दिसून आले आहे. काही उमेदवारांकडून सांकेतिक शब्दांचा वापर करत निवडणूक प्रचार सुरू असल्याचे समोर आले आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार प्रचाराची मुदत संपल्यानंतर कोणत्याही स्वरुपामध्ये प्रचार करता येत नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार करता येत नाही. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमात असलेली पळवाट शोधण्यात काही उमेदवार यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. ही पळवाट इतकी भारी आहे की, उमेदवारांनी थेट टॅगलाईनचे होर्डिंग हे पुण्यात झळकावले आहेत.पुण्यात अजून सुध्दा उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. उमेदवारांकडून टॅगलाईनचा वापर करत फ्लेक्स, होर्डिंगच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा उमेदवारांकडून सांकेतिक भाषेत प्रचार अजूनही सुरूच असल्याचे दिसून आले आहे.

आज पुणे शहरातील अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात असल्याचे समोर आले आहे.शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या फ्लेक्स वरती निवडणूक आयोग कोणती कार्यवाही करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणारं आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai