जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पंढरपूर :- पंढरपूरजवळील कौठाळी हद्दीत चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरचे नियंत्रण सुटून कार तीन वेळा पल्टी खाऊन उलटली त्यामध्ये चालकासह इतर तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात इतर तीन जण हे जखमी आसून व यामधील चारजण हे सदरच्या अपघातातून सुखरूप बचावले आहेत, त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय काल झालेल्या घटणेतून आला आहे त्यामध्ये तीन लहान मुली हया अपघातातून सुखरूप बचावल्या आहेत परंतू त्यांचाचं आसणारा लहान भाऊ विराज ( वय ५ वर्षे ) हा पुढे बसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे , या झालेल्या घटनेमुळे संपूर्ण पवारवाडी ता. फलटण गावावर शोककळा पसरलेली आहे.
सदरील अपघात रविवार दिनांक १७ रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास झाला असून सदरील अपघातामध्ये चालक सुदाम तानाजी नलवडे (वय ५५),एकनाथ दत्तू निंबाळकर (वय ३५ ),विराज एकनाथ निंबाळकर (वय ५),शोभा धनाजी कन्हेरकर (वय ५५) सर्व राहणार पवारवाडी ता.फलटण जि.सातारा येथील आसून या अपघातात त्यांचा जागेवर मृत्यू झाला आहे. व इतर तीनजण जखमी असून अन्य चारजण हे सदरच्या अपघातातून सुखरूप बचावले आहेत.
पवारवाडी येथून शनिवार (दि.१६ ) रोजी रात्री 11 वाजता निंबाळकर कुटुंबीय हे तुळजापूर पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते.पंढरपूर पासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कौठाळी गावच्या हद्दीत रात्री दीड वाजताच्या सुमारास कार (MH48 AW5543) या कारने सर्वजण पंढरपूरच्या दिशेने जात आसताना कारचा चालक सुदाम नलवडे यास ड्लकी लागल्याने व त्याचं कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यावर तीन वेळा पलटी खाऊन उलटली व रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळली या भीषण अपघातात कारचा चक्का चूर झाला असून तसेच सदरचा अपघात हा मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याने आसपासच्या परिसरात लोकवस्ती नसल्याने गंभीर जखमींना तात्काळ मदत मिळू शकली नाही त्यामुळे कार मधील चारजणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह