सातारा पोलीसांकडून,शिरवळ येथील जुगार अड्ड्यावरील छाप्यात तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत, ४५ जुगार प्रेमींना घेतले ताब्यात.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

शिरवळ : शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा महामार्गापासून ३००-४०० मीटरवर असणाऱ्या धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील एका नामांकित जुगार अड्यावर साताऱ्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पोलीस सहकाऱ्यांसह गुरुवारी (दि. ३१ ऑक्टोबर) रात्री छापा टाकला. यामध्ये तब्बल ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १ कोटी १ लाख २० वीस हजार ३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची. माहिती  डॉ.वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी दि. ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, धनगरवाडी (ता. खंडाळा) हद्दीतील डॉ. जगताप हॉस्पिटलच्या पाठीमागे पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये काही जण तीन पानी पत्त्याचा जुगाराचा अड्डा चालवत आहेत. त्यानंतर त्यांनी तातडीने स्वत तसेच भुईंज पोलीस ठाणे व शिरवळ पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी त्यांना एकूण ४३ इसम जुगार खेळत असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगार साहित्य, विदेशी दारु, बिअर, मोबाईल हॅन्डसेट तसेच ६ चारचाकी वाहने व १४ दुचाकी वाहने असा एकूण १ कोटी ९ लाख २० वीस हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणारे ४३ व्यक्ती, जुगार अड्डा चालक व पोल्ट्री शेड मालक असे एकूण तब्बल ४५ जणांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामध्ये १) रमजान उर्फ मुन्ना गणीभाई शेख (रा. शिरवळ ता. खंडाळा, जुगार अड्डा चालक), २) रमेश बाबासो मोटे रा. धनगरवाडी ता. खंडाळा जि.सातारा (जागा पोल्ट्री शेड मालक), ३) विठ्ठल भिकोबा धुमाळ (रा. जोगवडे ता. भोर जि.पुणे), ४) राहुल सिध्दराम गौडगाव (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), ५) विशाल भारत नगरे (रा. सासवड ता. पुरंदर जि.पुणे), ६) आकाश संजय जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे), ७) विजय पांडुरंग भंडलकर (रा. बाठार कॉलनी ता. खंडाळा जि.सातारा), ८) तानाजी शामराव कोळपे (रा. सालपे ता. फलटण जि. सातारा), ९) आप्पासो लालासो सालगुडे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), १०) लक्ष्मण गणपत गोफणे (रा. मासाळवाडी ता. बारामती जि. पुणे), ११) चंदन अशोक काकडे (रा. कोळकी मालोजीनगर फलटण), १२) अनिश शमशुद्दीन खान (रा. आझादगल्ली शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), १३) सोमनाथ बाळासो जाधव (रा. केळवडे ता. भोर जि. सातारा), २४) सुभाष गणपत गायकवाड (रा.डाणीकर कॉलनी कोथरूड पुणे), १५) असिफ अफजल खान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), १६) अभयसिंह चंद्रकांत ननावरे (रा. शेडगेवाडी ता. खंडाळा जि.सातारा), २७) प्रशांत रमेश जगताप (रा. लांडगे आळी सासवड ता. पुरंदर जि.पुणे), १८) प्रकाश बचन राऊत (रा. पळशी ता. खंडाळा), १९) बापू लक्ष्मण आगम (रा. शास्त्रीचीक लोणंद जि. सातारा), २०) भुषन शिवाजी शिंदे (रा. सालपे ता. खंडाळा जि. सातारा), २१) रोहित बाळू कुंभकर (रा. भेलकेवाडी ता. भोर जि. पुणे), २२) स्वझील विनायक जगताप (रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे), २३) महेंद्र विष्णू फडतरे (रा. बावडा ता. खंडाळा जि. सातारा),

२४) नंदु मनीराम जस्वाल (रा. कात्रज पुणे), २५) तुकाराम साहेबराव दराडे (रा. स्वारगेट पुणे),

२६) ज्ञानेश्वर गजानन बालपांडे (रा. सिंहगड रोड पुणे), २७) गोरख वसंत कांबळे (रा.

नारायणपुर ता. सासवड जि. पुणे), २८) विलास सुरेश वैराट (रा. शिरवळ ता. खंडाळा जि.

सातारा), २९) राजेंद्र उत्तम तावरे (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), ३०) वैभव विजय भुतकर

(रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), ३१) शब्बीर गफार पठाण (रा. शिरवळ ता. सांडाळा जि. सातारा), ३२) शाहिन शीकत बागवान (रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा), ३३) मिलींद साहेबराव विहीळकर (रा. वाई ता. वाई जि. सातारा), ३४) सुर्यकांत हरीचंद्र साळुंखे (रा. सहयाद्री सिटी नसरापुर ता. भोर जि. पुणे), ३५) धर्मेंद्र थिसुलाल जैन (रा.भोर जि.पुणे), ३६) प्रकाश अशोक जाधव (रा.तानाजी चौक शिस्वळ ता. खंडाळा जि. सातारा), ३७) अविनाश भानुदास पेडकर (रा. दत्तनगर फलटण जि.सातारा), ३८) सुनिल किसन मुळीक (रा. सांगवी ता. बारामती जि. पुणे), ३१) विकास संजय पवार (रा. सटवाई शिरवळ ता. खंडाळा),

४० ) मयुर अशोक जाधव (रा.तानाजी चौक, शिस्वळ), ४१) ऋषीकेश बंडू पचार (रा. अंबिकामाता मंदिर शिरवळ), ४२) सुनिल ब्रदीनाथ सुर्यवंशी (रा. चिचवेवाडी ता. पुणे), ४३) अशोक सोपान चिकणे (रा. कन्हेरी ता. खंडाळा), ४४) सागर एकनाथ गायकवाड (रा. कोंढावळे ता. वेल्हा जि. पुणे), ४५) राम भुजूंग साठे (रा. बिबवेवाडी पुणे) यांचा समावेश आहे.

सदरची कारवाई ही सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, पोलीस निरीक्षक संदिप जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गजें तसेच आर.सी.पी. प्लाटून मधील पोलीस अंमलदार व शिरवळ पोलीस ठाणे व भुईज पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांनी केली असून कारवाई मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर व समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai