जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः- लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र अवघ्या 10 जागा लढवून 8 जागांवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्व पक्षांपेक्षा अधिक होता. विधानसभेत सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पदरात कमी जागा पडल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही असं विधान सुद्धा शरद पवारांनी केलं होतं. खरं तर शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणारी ही अत्यंत महत्वाची निवडणूक आहे.
परिणामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महा विकास आघाडीत दुरावा, मतभेद आणि वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष निर्णायक भूमिकेत असणार आहे यात नवल काहीच नाही.
शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णायक भूमिकेत आसणार का?
लोकसभेनंतर विधानसभेसाठी पायाभरणी झाली आहे का ?
विधानसभे आगोदर शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा का झाला?
शरद पवार विरुद्ध अजित पवार लढतीत शरद पवारांना साथ मिळणार का ?
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष निर्णायक भूमिकेत आसणार आहे का ?
मराठा मतदारांवरच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाची भुरळ आसणार का?
या निवडणूकीत जरांगे पाटील फॅक्टरचा परिनाम पहावयास मिळणार का?
लोकसभेच्या निकालानंतर ‘महायुती’ ही सावध झाली आहे. त्यामुळे विविध कल्याणकारी लोकाभिमुख योजनांचे धडाधड निर्णय घेत लोकसभेच्या निकालाचे अपयश पुसण्याचा आटोकाट प्रयत्न महायुतीकडून केला आहे.अशातच निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, हे सांगणे सध्या तरी कठीण झालं आहे.त्यामुळेच निकालानंतर काँग्रेस आणि भाजप वगळता उर्वरित पक्ष हे कोणाशी ही ‘युती आणि आघाडी’ करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पुढील काळात शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत राहील, असा अंदाज आता तज्ञांकडून बांधला जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महा विकास आघाडीला फायद्याचे ठरलं होतं. त्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांनी भरभरून मतांची साथ देऊन चांगली साथ दिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमी जागा लढवून सुद्धा निर्णायक भूमिकेत असण्याची दाट शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.
त्यामुळे शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोण कोणत्या पक्षावर भारी पडणार हेच आता पुढील काळात पहावयास मिळणार आहे असं चित्र सध्यातरी दिसत आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह