इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा ; हर्षवर्धन पाटील यांच्याकडचं कसा ? काँग्रेस आमदार संजय जगताप यांचा सवाल.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :- इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना वेळोवेळी आमदार करून मंत्रीपदे दिली आहेत. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडताना इंदापूर काँग्रेस भवनाच्या इमारतीची आतील भागात मोडतोड केली होती. तसेच इमारतीचे नुकसान करून कब्जा हा सोडला नव्हता. इंदापूर काँग्रेस भवनाची इमारत आणि जागा इंदापूर काँग्रेस समितीच्या ताब्यात नाही. परंतू मालकी हक्कासंबंधीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून कागदपत्रांवर इंदापूर तालुका काँग्रेस चॅरीटेबल ट्रस्ट असे दर्शविण्यात आले आहे. या संदर्भात सिटी सर्व्हे, मिळकत पत्रिका आणि जागेचा नकाशा ही खोटी कागदपत्रे तयार करण्यात आलेली आहेत, अशा पद्धतीचा आक्षेप कॉग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्याकडून घेण्यात आला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे इंदापूर काँग्रेस भवनाचा ताबा अद्यापही असून त्यांनी तो सोडलेला नाही.त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे पुरंदरचे आमदार, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पाटील यांची उमेदवारी नाकारण्यात यावी, अशी आग्रही मागणी कॉग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी केली आहे. त्यामुळे इंदापूर काँग्रेस भवनाच्या इमारतीच्या ताब्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आता महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस पक्ष आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूका होणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये इंदापूर ची जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस भवनाची इमारत आणि जागा ताब्यात ठेवली आहे. ती जोपर्यंत पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्यांना इंदापूर मधून उमेदवारी देण्यात येऊ नये. तसेच हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस भवनाचा ताबा ठेवल्याची माहिती मतदारसंघात प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. इंदापूर मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तशी भूमिका आहे, असे यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें