जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
मुंबई :- राज्य सरकारच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे , की दिवाळी बोनस म्हणून लाडक्या बहीणींना ३००० ते ५००० रुपये बोनस हा दिला जाणार आहे त्यासाठी काही अटी या लाडक्य बहिणींना पूर्ण कराव्या लागणार आहेत. लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक महत्त्वपुर्ण योजना असून , राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिलं जातं आहे. तसेच हि रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात असल्यामुळे , या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नियमावलीचे पालन हे करावं लागतं आहे. त्यांच वय २१ ते ६० वर्षांपर्यंत असले पाहिजे. तसेच ती महिला महाराष्ट्राची रहिवाशी असली पाहिजे. तसेच त्यांच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. तरच या योजनेचा लाभ घेता येतो.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने म्हटलंय की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना ३००० बोनस ही दिलं जाणार आहे . सदरची रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे सोडून दिली जाणार आहे. तसेच काही निवडक महिलांना २५०० रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाणार आहे. त्याच प्रमाणे काही महिलांना एकूण ३०००+२५००=५५०० रुपयापर्यंत लाभ हा मिळणार आहे. दिवाळी बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी पुढील प्रमाणे अटी या पूर्ण कराव्या लागणार आहेत.
१) महिलेचे नाव हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूची मध्ये असलं पाहिजे. तरच सदरची रक्कम मिळणार आहे.
२) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
३) त्यासाठी त्यांचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे तरच सदरची रक्कम ही मिळणार आहे.
४) ही योजना सर्व नियम आणि अटींचे पालन करत आहेत. तसेच या अटी पूर्ण केलेल्या सर्व लाडक्या बहिणींना ३००० रुपयांचा बोनस हा मिळणार आहे. सदरील रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून जमा केली जाणार आहे.
सदरची योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांचं सशक्तीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाडक्या बहीनींसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय आहे की, दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ३००० बोनस हा दिला जाणार आहे. तसेच काही निवडक महिलांना अतिरिक्त २५०० रुपये हे राज्य सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह