मोरवाडी येथे 1 कोटी 25 लाख रुपयांच्या विविध विकासकांमाचे भुमीपूजन !!.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी

भोर, मोरवाडी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पार पडली आहेत. यामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 1 कोटी 25 लाख रुपयांचा निधी हा रणजीत दादा शिवतारे मा.उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे ,चंद्रकांत बाठे जिल्हा परिषद सदस्य पुणे तसेच विक्रम दादा खुटवड उपसभापती पंचायत समिती भोर यांच्या विशेष प्रयत्नातून सदरील निधी मंजूर झाला आहे असे माध्यमांना बोलताना सरपंच ज्योती दिपक मोरे म्हणाल्या आहेत.


या निधीतून मोरवाडी ग्रामपंचायत नवीन इमारत बांधणे ,गावातील अंतर्गत रस्ते करणे, नवीन सभा मंडप बांधणे,नवीन पाणीपुरवठा योजना तसेच स्मशानभूमी दुरुस्ती करणे इत्यादी विकास कामांचं भूमिपूजन समारंभ आज रोजी पार पडला.या कार्यक्रमला संतोष घोरपडे अध्यक्ष भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,भालचंद्र जगताप संचालक पिडीसी बँक पुणे ,प्रकाश तनपुरे सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा ,गणेश निगडे उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच इकबाल शेख शाखा अभियंता पंचायत समिती भोर इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच ज्योती दीपक मोरे , उपसरपंच संतोष मोरे,ग्रामपंचायत सदस्य किरण मोरे , सारिका मोरे, दिपाली जाधव, हेमंत कारळे, मा. उपसरपंच संगीता मोरे आणि ग्रामसेविका ज्योती धायतडक यांच्या वतीने ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले होते.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें