जनसंघर्ष न्यूज इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर , 2 ऑक्टोबर रोजी जन संघर्ष न्यूज चॅनलला देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर चर्चा निष्फळ ठरल्यानं ,हर्षवर्धन पाटील धरणार का तुतारीची वाट का, लढणार अपक्ष ?या मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती.
आज दि.४ रोजी तंतोतंत खरं ठरलं आहे . इंदापूर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये सर्वांमध्ये चर्चा करण्यात आली की आपण सर्वांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश करून आगामी होणाऱ्या इंदापूर विधानसभेची निवडणूक ही तुतारी चिन्हावर लढवून मोठ्या मताधिक्याने जिंकून पुढे जाऊ असे सर्वांनुमते ठरलं त्यानंतर दुपारी बैठक झाल्यानंतर याची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी केली.
यावेळी ते बोलताना म्हणाले की मी शरद पवार साहेबांना सिल्वर ओकवर भेटलो त्यावेळेस साहेब म्हणाले की हर्षवर्धन तुम्ही पुढे काय करायचं ठरवलं आहे त्यावेळेस मी म्हणालो की आपणच मला मार्गदर्शन करावे त्यावेळेस पवार साहेब म्हणाले की , तुमच्याकडे जनसंपर्क चांगला आहे तसेच आपण एक अभ्यासू व्यक्तीमत्व आहात त्यामुळे तुमच्या इंदापूर तालुक्यातून जो सुर उमटत आहे त्या बाजूने आपण उभे राहून , आपली ताकद येणाऱ्या विधानसभेला दाखवून द्यावी असं मला वाटतं .
तसेच आजचं इंदापूर तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपच्या सर्वपदांचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत केली आहे .

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 142