जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, मंत्री पद्माकर वळवी यांनी मंगळवारी भाजपची साथ सोडली असून. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील एक भाजपचा बडा नेता भाजप पक्षाची साथ सोडणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या बड्या नेत्याची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर भाजप सोडणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या पक्षाला रामराम करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतची बैठक निष्फळ ठरली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार असल्याचं निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांत हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. पुण्यात पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहेत इंदापुरची राजकीय समीकरणे?
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ला काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुढे राष्ट्रावादी फुटून अजित पवार गटाने महायुतीला साथ दिली. त्यानंतर इंदापूर मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं. आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील अजित पवारांना सांगितलं. त्यामुळे इंदापूर मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय. याचदरम्यान, इंदापुर तालुकयातून दत्तात्रय मामा भरणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिकची आसल्याने. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आसल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंदापुर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंदापूर भागात भाद्रपद पोळा साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढली जाते. सध्या इंदापुर तालुकयात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात तापल्याच चित्र आता दिसू लागल आहे. त्यातच इंदापुर तालुक्यातील भिगवण येथील हर्षवर्धन पाटील प्रेमी शाहरुख शेख या शेतकऱ्याने तर बैलपोळा निमित्त हर्षवर्धन पाटील 2024फिक्स आमदार, तुतारी वाजविणारा माणूस अशा आशयाचे चित्र रेखाटलं आहे. त्याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 96