पुणे जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
तु मला आवडतेस…. केबिनमध्ये चल; पालिका अधिकाऱ्याचे महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन; सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल…
पुणेः ‘तु मला खुप आवडतेस, माझ्यासोबत बंद केबिनमध्ये चल आपण वैयक्तिक बोलू’ असे म्हणत पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील वासनांध वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाने सहकारी कर्मचारी महिलेशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गणपत लाड (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.
दि. ३० रोजी महिला कर्मचारी कार्यालयात एकटी असताना चंद्रकांत लाड तिच्याजवळ गेला व केबिनमध्ये येण्यास सांगू लागला. त्यावेळी संबंधित महिलेने केबिनमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर,” मी तुला कामात सुट देतो. पाहिजे तेव्हा सुट्टी देतो. त्यामुळे तू माझे एक काम कर, केबिनमध्ये चल,” असे चंद्रकांत लाड त्या कर्मचारी महिलेला म्हणाला.
दरम्यान घाबरलेल्या महिला कर्मचाऱ्यानी ही बाब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. महिलेच्या तक्रारीवरून वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याच्या विरोधात सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आसून. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय अधिकचा तपास करत आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह