संपादकीय जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा, जिल्ह्याला ऐतिहासिक असे महत्त्व आहे,ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे,सातारा शहर हे पश्चिम महाराष्ट्रात येते तसेच सातारा शहराची स्थापना पहिले छत्रपती शाहू महाराज यांनी सोळाव्या शतकात केली होती तसेच या जिल्ह्यामध्ये एकूण 27 ऐतिहासिक किल्ले येतात.यामध्ये प्रामुख्याने पाच किल्ल्यांची नावे अग्रस्थानी आहेत ती म्हणजे अजिंक्यतारा,सज्जनगड, प्रतापगड,वासोटा किल्ला आणि कमळगड होय.
याचं मातीने अनेक रत्न जन्माला घातले आहेत,त्यामुळे या जिल्ह्याची ओळख अजून ही संपूर्ण देशामध्ये अग्रक्रमाने आहे.याचं मातीत एक नवीन गोष्ट घडली आहे ,ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये सानिका विकास मोजर रा. न्हाळेवाडी, ता.सातारा, जि. सातारा सध्या राहणार मुंबई लोअर परेल या कन्येचा याचं मातीत जन्म झाला हीचं कुटुंब हे साधारण वर्गातील,तिला लहानपणापासूनचं अभिनय करणे व नृत्यकलेची आवड होती,तिचं प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण गावाकडचं झाल्यानंतर,पुढचं शिक्षण सायन्स शाखेतून मायक्रोबायोलॉजी मधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करत असताना तिने आपल्या कलेची आवड जोपासत अनेक नृत्य स्पर्धा व अभिनय स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेऊन अनेक पुरस्कार देखील मिळविले आहेत.
तसेच या दरम्यान तिला जाहिरातींसाठी सुद्धा ऑफर आल्यानंतर तिने जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली ,त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. पुढे जाऊन तिने लघुपट तसेच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली , गेल्या वर्षीचा म्हणजेच 2023 सालचा महाराष्ट्र श्रावण क्वीन स्पर्धेत तिची अंतिम फेरीत निवड होऊन त्यावर्षीचा बेस्ट ब्युटीफूल स्किन चा अवार्ड तिला मिळाल्यानंतर तिची निवड मराठी प्रेक्षकांची आवडती मराठी वाहिनी , कलर्स मराठी या वाहिनीवर प्रेक्षेपित होणाऱ्या ” लय आवडतेस तू मला ” या मालिकेत तिला प्रमुख भूमिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविण्यास सुरुवात केली त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातूनचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून तिच्या या यशाचे आता कौतुक होतय .
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 292