जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
इंदापूर, इंदापूर तालुक्यातील कुरवली गावामधील 80 वर्षाच्या इसमाकडून 26 वर्षीय मतिमंद मुलीवर अतिप्रसंग झाल्याबद्दल लिंगपिसाट नीच वृत्तीच्या 80 वर्षाच्या इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,तरी सुद्धा त्याच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतरांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देण्यात आले.मोठ्या संख्येने हिंदू कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
80 वर्षांच्या वृद्धाने मतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर मधील कुरवली गावामध्ये घटना घडली असून , याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये सदरील लिंगपिसाट वृत्तीच्या आरोपी विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.या घटनेमुळे संपूर्ण इंदापूर तालुकयात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील कुरवली गावामध्ये सदरची घटना घडली असून , एका २६ वर्षीय मतीमंद मुलीवर 80 वर्षाच्या वृद्धाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलिसांनी तातडीने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. या घटनेचा अधिकचा तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली हे करत आहेत.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 212