जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सासवड,राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत झाला आसून मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी उपोषणं, गाव बंद, तालुका बंद आंदोलनांनी आता जोर धरल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे, याच प्राश्वभुमीवरती आज सासवड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी पुरंदर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
या बंद दरम्यान शहरातील दुकान बंद होती तसेच पुरंदर बंदला नागरिकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून पुरंदर तालुक्यातील अनेक संघटनांनी सदरच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.सासवड शहरातील शिवतीर्थावर सकल मराठा बांधव हे मोठ्या संख्येने जमले होते. तसेच मराठा बांधवांकडून “एक मराठा लाख मराठा ” अशा आशयाच्या घोषणा यादरम्यान देण्यात आल्या आहेत. यावेळी सासवड तालुका नायब तहसीलदार माधव जाधव,सासवड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ऋषिकेश धर्माधिकारी यांना मराठा समाजाच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 94