जनसंघर्ष न्यूज प्रतिनिधी
लातूर जिल्हयामध्ये एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे, संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच जोर धरू लागल्याचे दिसत आहे. त्यातच लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने मराठ समाजाच्य पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अहमदपूरच्या ज्ञानोबा तिडोळे आणि पत्नी चंचला तिडोळे या मराठा दापत्यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आता समोर आले आहे. या घटनेनंतर संपुर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली असून बीड मधील मराठा आरक्षणासाठी जीव संपवणार असल्याची सुसाईड नोट देत आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मराठवाड्यामध्ये आणखी एक असाच प्रकार घडल्याने संपूर्ण समाजामधून सरकारविरुद्ध रोष व्यक्त होताना दिसत आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ६ वेळा उपोषण केले आहे. मात्र उपोषण करून सुद्धा सरकारने त्यांच्या उपोषणाची साधी दखल हो घेतली नाही. तसेच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. याच निराशेमधून दोन्ही दापंत्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे यावरून दिसत आहे. अहमदपूर मधील राहणाऱ्या दापत्यांनी मराठा आरक्षणासाठी विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
त्यादरम्यान, वेळीच त्यांना समाज बांधवांनी खासगी रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्या दोघांचा जीव वाचला आहे तसेच सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती थोडीशी चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच मराठवाड्यात यापूर्वी बार्शीतल्या एका तरुणाने सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी स्वःताचे आयुष्य संपवल्याची घटना घडली होती.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 125