खंडाळा येथे हिंदू संघटनेकडून स्वामी समर्थांबद्दल आक्षेपाहार्य विधान केल्या प्रकरणी; ज्ञानेश महाराज वर गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी..!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज लाईव्ह प्रतिनिधी:-

खंडाळा, संपूर्ण हिंदूचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून अनेक स्वामी भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला येत असतात. स्वामींचे पुण्यतिथी असो अथवा जयंती सर्वच उत्सव गुण्या गोविंदात आनंदात साजरे होतात. अक्कलकोटला स्वामींचे दर्शनासाठी नेहमी अलोट गर्दी पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनेक भक्त भाविकांच्या पाठीशी असल्याने समाजात शांतता सुव्यवस्था सर्वच सण उत्सव आनंदात साजरे केले जातात. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव प्रत्येकास प्रामुख्याने अनुभवास मिळतो.
याच स्वामी समर्थां बद्दल समाजात शांतता सुव्यवस्था याला बाधा आणत समाजकंटक ज्ञानेश महाराव याने अवमानकारक वक्तव्य केल आहे. विशेष म्हणजे खा. शरदचंद्र पवार व कोल्हापूरचे खा.शाहू महाराज यांच्यासमोरच एका कार्यक्रमात असं वक्तव्य केल्याने समाजातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. या समाजकंटक आसणाऱ्या ज्ञानेश महाराव वर भक्तगणांनी तीव्र शब्दात निषेध त्याचा व्यक्त केला आहे.
या ज्ञानेश महाराव याच्या आव्हान अवमान कारक वक्तव्यानंतर भक्तगणांशी मने दुखावले गेले असून ज्ञानेश महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी खंडाळा येथील हिंदू संघटनेनी पोलीस अधिकारी यांच्याकडे केली आहे. या घटनेचा सर्व स्तरावरून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येतोय. या निवेदना नंतर ज्ञानेश महाराव याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन हिंदू संघटनेला दिले आहे
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool