जनसंघर्ष न्यूज लाईव्ह नेटवर्क
सातारा- नदीकाठी भंगार गोळा करणाऱ्या नूरजहाँ फकीर या महिलेला कऱ्हाड मधील प्रीतिसंगम घाटावर तब्बल दहा तोळ्यांचा सोन्याचा राणीहार सापडला होता. लाखो रुपयांचा हा ऐवज हातात आल्यानंतर कुणाचीही नीतिमत्ता डगमगली असती. परंतू हातावर पोट असणाऱ्या त्या महिलेने स्वःताकडील प्रामाणिकपणा जपत सोनाराच्या माध्यमातून तो राणी हार पोलिसांकडे सुपूर्द केला. तसेच पोलिसांनी तो हार मालकाला परत केला आहे.
भंगार गोळा करत असताना त्यांना राणीहार दिसला. त्यानंतर नूरजहाँ यांनी तो राणीहार त्यांच्या ओळखीचे सराफ व्यावसायिक निसार सय्यद यांच्याकडे आणून दिला. निसार सय्यद यांनी याची माहिती माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना दिली. त्यानंतर तिघेही कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आले होते. त्यांच्याकडे त्यांनी तो हार जमा केला आहे. त्यानंतर पोलिसांनी गोटे येथील अधिक राव पवार यांना बोलावून घेत ओळख पटवून राणी हार त्यांच्या ताब्यात दिला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 113