“२५ दिवसांच्या नियमाने फुटला गॅस घोटाळा! घरगुती सिलिंडर ‘ब्लॅक’मध्ये विक्रीचा मोठा खेळ उघड”

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे, ता.१६: घरगुती एलपीजी गॅसच्या बुकिंगसाठी केंद्र सरकारने २५ दिवसांची वेळमर्यादा लागू केल्यानंतर देशभरात गॅस वितरण व्यवस्थेतील मोठा गैरप्रकार समोर आला आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सी मालकांनी संगनमताने तयार केलेल्या सिंडिकेट मधून घरगुती ग्राहकांच्या नावावर बनावट बुकिंग करून सिलिंडर काळ्या बाजारात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे.
सरकारने भविष्यातील गॅस पुरवठा सुरळीत राहावा आणि वितरणात शिस्त राहावी यासाठी हा नियम लागू केला. मात्र नियम लागू होताच अनेक ग्राहकांना गॅस बुक करताना “Already Booked” असा संदेश दिसू लागला. विशेष म्हणजे संबंधित ग्राहकांनी मागील महिनाभरात सिलिंडर घेतलेलाच नसतानाही त्यांच्या नावावर बुकिंग झाल्याचे दिसत असल्याने मोठा संशय निर्माण झाला.
या प्रकारामुळे संतप्त ग्राहकांनी गॅस एजन्स्यांबाहेर गर्दी करत स्पष्टीकरणाची मागणी सुरू केली. अनेक ठिकाणी एजन्सी चालकांनी जबाब टाळल्याने वाद आणि गोंधळाचे प्रकारही घडले. गॅस कंपन्यांच्या सर्व्हरवरील नोंदी तपासल्यानंतर ग्राहकांच्या नावावरचे सिलिंडर आधीच वितरण झाल्याचे दिसून आले.
तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, काही एजन्सी मालक घरगुती ग्राहकांच्या नावावर स्वतःच रिफिल बुकिंग करत होते. त्यानंतर तेच सिलिंडर जास्त दराने हॉटेल, रेस्टॉरंट आणि औद्योगिक आस्थापनांना ‘ब्लॅक’मध्ये विकले जात होते. यामुळे प्रत्यक्षात गॅसची कमतरता नसतानाही कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारच्या २५ दिवसांच्या नियमामुळे हा काळा बाजार उघडकीस आला असून संबंधित एजन्स्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. ग्राहकांनीही आपल्या नावावर बनावट बुकिंग झाल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन :
LPG आपत्कालीन हेल्पलाइन : 1906
भारत गॅस : 1800-22-4344
इंडेन गॅस : 1800-233-3555
एचपी गॅस : 1800-233-3555
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन : 1800-11-4000 / 1915
ग्राहकांनी जागरूक राहून अशा गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!