स्वाती बागल,सागर वाबळे, राणी बंडगर यांच्या एंन्ट्री मुळे भिगवण शेटफळगढे निवडणूक होणार लक्षवेधी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

स्वाती बागल,सागर वाबळे, राणी बंडगर यांच्या एंन्ट्री मुळे भिगवण शेटफळगढे निवडणूक होणार लक्षवेधी

जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३

इंदापूर, ता.२५ : पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटात यंदा मोठी चुरस पाहायला मिळत आहे. तब्बल वीस वर्षांनंतर जिल्हा परिषद  गट सर्वसाधारण महिलेसाठी भिगवण पंचायत समिती सर्वसाधारण महिला व शेटफळगढे पंचायत समिती गट सर्वसाधारण पुरुष जागेसाठी राखीव झाला असला, तरी प्रमुख राजकीय पक्षांनी सर्वसाधारण गटातील उमेदवार न दिल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सर्वसाधारण  राखीव असलेल्या या जागेवर सर्वसाधारण गटातील उमेदवार का दिला नाही असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची व पंचायत समितीची निवडणूकीची तयारी करत असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

दरम्यान, शेटफळगढे गणाला अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्वाची संधी मिळालेली नाही. सातत्याने भिगवण गणातील उमेदवार देत असल्याने शेटफळगढे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. विशेष म्हणजे, भिगवण आणि शेटफळगढे या दोन्ही गणातील मतदारसंख्या जवळपास समान असतानाही शेटफळगढे गणाला डावलले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. शेटफळगढे गणातील उमेदवारांना जिल्हा परिषद साठी संधी कधी मिळणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक व पिंपळे गावचे सरपंच अनिल बागल यांच्या पत्नी स्वाती अनिल बागल यांनी स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते सागर वाबळे  स्वतः मैदानात उतरले आहेत. सोबत भिगवण पंचायत समिती साठी पोंधवडी  गावचे माजी सरपंच नाना बंडगर यांच्या पत्नी माजी सरपंच राणी बंडगर या देखील लढण्यावर ठाम आहेत.यांच्या उमेदवारीमुळे या गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भिगवण परिसरात अनिल बागल यांचे मजबूत सामाजिक जाळे, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि स्थानिक पातळीवरील संपर्क, तसेंच तीनही उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क लक्षात घेता तीनही उमेदवारांना  निवडणुकीत तुलनेने फायदा होऊ शकतो, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. परिणामी, यंदाच्या निवडणुकीत भिगवण शेटफळगढे गटात तिरंगी लढत होण्याची शक्यता असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी काळात मतदारांचा कल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!