म्हसोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. माधुरी चांदगुडे बिनविरोध

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

म्हसोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. माधुरी चांदगुडे बिनविरोध

जनसंघर्ष न्युज नेटवर्क / बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३

इंदापूर, ता.२३: म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच शांततेत पार पडली. या निवडणुकीत सौ. माधुरी श्रीकांत चांदगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी गावचे विद्यमान सरपंच श्री. राजेंद्र महादेव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सोनाली गवळी यांनी निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका बजावत नियमाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण केली. उपसरपंचपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने सौ. माधुरी चांदगुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या प्रसंगी माजी उपसरपंच सौ. सविता अशोक मराळ, ग्रामपंचायत सदस्या सौ. कमल विलास पवार, ग्रामपंचायत सदस्य श्री. रमेश बबन चांदगुडे, श्री. प्रमोद सदाशिव खंडाळे, श्री. दत्तात्रय काशिनाथ राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच श्रीकांत चांदगुडे, हेमंत चांदगुडे, प्रशांत चांदगुडे, सचिन चांदगुडे, मच्छिंद्र पवार, सुनील पवार, मुकंदर मुलाणी, सलमान मुलाणी, प्रशांत शामराव चांदगुडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

निवडीनंतर सरपंच श्री. राजेंद्र राऊत यांनी सौ. माधुरी चांदगुडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासाची केंद्रबिंदू संस्था असून उपसरपंचपदाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या उपसरपंचांकडून पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व महिला-सशक्तीकरण यांसारख्या विषयांवर विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निवड स्वीकारताना सौ. माधुरी चांदगुडे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. “गावाच्या विकासासाठी सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे त्यांनी सांगितले.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!