गावकऱ्यांच्या शुभेच्छांच्या वर्षावात, सचिन चांदगुडे यांचा सत्कार; म्हसोबाचीवाडी ग्रामस्थांचा अभिमान वाढला!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क |
इंदापूर, ता.१७ :इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने दि.१६ रोजी भव्य सत्कार सोहळा पार पडला. इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नव्याने निवड झालेले तालुका सरचिटणीस श्री. सचिन हनुमंत चांदगुडे यांचा या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या वतीने दिमाखदार सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गावातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र राऊत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील ॲड.तुषार झेंडेपाटील, वि.वि. कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अनिकेत झेंडेपाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासो साळुंके, तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोल चांदगुडे उपस्थित होते.
यावेळी माजी उपसरपंच निलेश पवार, जेष्ठ नागरिक दिलीपराव नांदगुडे, दत्तात्रय मराळ, अतुल नांदगुडे, विकास चांदगुडे, आण्णासो चांदगुडे, लक्ष्मण शेलार, आण्णासो साळुंके, स्वप्निल पवार, रमेश खराडे, दिग्वीजय साळुंके, छगन मराळ, दिपक चांदगुडे, पुष्पशिल साळुंके, अक्षय साळुंके, पृथ्वीराज साळुंके, सौरभ चांदगुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सत्कारानंतर बोलताना सचिन चांदगुडे म्हणाले, “गावकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेन. पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी शासनदरबारी मांडण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.तुषार झेंडे पाटील यांनी केले. शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी चांदगुडे यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, आनंद आणि ऐक्याचे वातावरण पाहायला मिळाले.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!