पक्षबांधणीला नवे बळ; सचिन चांदगुडे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीसपदी निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क |
इंदापूर, ता.१४ : इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी आणि पक्ष संघटनेला नवे बळ देणारी नियुक्ती — श्री. सचिन हनुमंत चांदगुडे यांची इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका संघटनेला नवे चैतन्य लाभणार आहे.
श्री. सचिन चांदगुडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, युवकांमध्ये नेतृत्वगुण, संघटनशक्ती आणि प्रामाणिक कार्यपद्धती यासाठी त्यांची ओळख आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून विकासकामात सहभाग घेणे आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करणे, हे त्यांचे सातत्याने ध्येय राहिले आहे.
या नियुक्तीचा कार्यक्रम इंदापूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील यांच्या हस्ते सचिन चांदगुडे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. पाटील यांनी अभिनंदन करताना सांगितले, “सचिन चांदगुडे हे प्रामाणिक, मेहनती आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाचे संघटन ग्रामीण पातळीवर अधिक मजबूत होईल.” त्यांनी सचिन चांदगुडे यांना युवकांना राजकारणात सक्रिय करण्याचे, पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आणि सामाजिक समन्वय वाढविण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी म्हसोबाचीवाडी ग्रामस्थांचा मोठा सहभाग होता. वि.वि. सेवा सोसायटीचे चेअरमन अनिकेत झेंडे पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लालासो साळुंके, तसेच दिलीप नांदगुडे, विकास चांदगुडे, सचिन पवार, सुजित सुर्यवंशी, मारुती मराळ, आण्णासो चांदगुडे, छगन मराळ, लक्ष्मण शेलार, दिपक चांदगुडे, दिग्वीजय साळुंके यांसह अनेक ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्री. सचिन चांदगुडे म्हणाले, “शरद पवार साहेबांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर प्रेरित होऊन ग्रामीण भागातील प्रश्न सोडविणे, तरुणांना राजकीय प्रवाहात आणणे आणि सामाजिक कार्यातून तालुक्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे, हेच माझे ध्येय राहील.”
त्यांच्या या निवडीमुळे इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) संघटन कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवउमेद आणि प्रेरणा निर्माण झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला की, सचिन चांदगुडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी अधिक गतिमान होईल आणि इंदापूर तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!