ईपीएफओचा मोठा निर्णय! सदस्यांना पीएफमधून 100 टक्के पैसे काढण्याची मुभा; नियम सोपे, प्रक्रिया पारदर्शक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे, ता.१४ : देशातील तब्बल 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधीतील (PF) जमा रकमेतून 100 टक्क्यांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय न्यास मंडळाच्या (CBT) बैठकीत घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्ष केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया होते.
ईपीएफओच्या या निर्णयामुळे सदस्यांना अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक गरजांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, तर निवृत्ती निधी सुरक्षित ठेवण्याची सोय देखील कायम राहील.
🔹 आता नियम झाले सोपे
आतापर्यंत पीएफमधून आंशिक पैसे काढण्यासाठी तब्बल 13 गुंतागुंतीचे नियम होते. हे नियम आता तीन सोप्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत —
 आजारपण, शिक्षण आणि लग्न यांसारख्या अत्यावश्यक गरजा
 घर खरेदी किंवा बांधकामासंबंधी निवासी गरजा
 काही विशेष परिस्थिती
विशेष म्हणजे, आता अर्ज करताना कारण स्पष्ट करण्याची सक्ती राहणार नाही. त्यामुळे पैसे काढण्याचे अर्ज नाकारले जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. शिक्षण आणि लग्नासाठी काढता येणाऱ्या रकमेची मर्यादाही वाढवण्यात आली आहे.
🔹 फक्त 12 महिन्यांची सेवा पुरेशी!
नव्या नियमानुसार पीएफमधून आंशिक पैसे काढण्यासाठी किमान 12 महिन्यांची सेवा पूर्ण असणे आवश्यक आहे. यापूर्वीचा कालावधी यापेक्षा जास्त होता.
तसेच सदस्यांनी आपल्या खात्यात किमान 25 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वार्षिक व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळून निवृत्तीसाठी मोठा निधी तयार करता येणार आहे.
🔹 सेटलमेंटची मुदत वाढवली
ईपीएफओने सेटलमेंटसंबंधीच्या नियमांतही बदल केले आहेत.
पीएफची मुदतपूर्व अंतिम सेटलमेंट आता 2 महिन्यांवरून 12 महिने करण्यात आली आहे.
तर अंतिम पेन्शन काढण्यासाठीची मुदत 2 महिन्यांवरून 36 महिने करण्यात आली आहे.
या सोप्या नियमांमुळे ईपीएफओ सदस्यांना त्यांच्या तात्काळ आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, तसेच त्यांच्या निवृत्ती बचतीवर परिणाम न होता आर्थिक स्थैर्य मिळेल.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “या बदलांमुळे कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीवरील विश्वास अधिक दृढ होईल आणि आर्थिक नियोजनात सुलभता येईल.”
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!