शिरवळ सज्ज ! अंबिकामाता नवरात्रोत्सवात होणार भक्तिरस आणि कलारसाचा संगम.!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
शिरवळ, ता.२२ | शिरवळचे ग्रामदैवत श्री अंबिकामाता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री अंबिकामाता नवरात्र महोत्सव समिती, शिरवळ यांच्यातर्फे आयोजित या उत्सवाला शिरवळ व परिसरातील भाविकांना सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.
उत्सवाचा शुभारंभ
२२ सप्टेंबर रोजी पहाटे महाभिषेक व घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर रात्री आठ वाजता महाआरतीनं कार्यक्रमांची रंगत खुलणार आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी लोककला, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रेणके बंधू जागरण गोंधळ पार्टी (इचलकरंजी) आणि गर्जना सह्याद्रीची लोकधारा महाराष्ट्राची या विशेष कला प्रस्तुती शाहीर श्रीकांत रेणके यांचे कार्यक्रम होणार आहेत.
विविध कार्यक्रमांची मेजवानी
उत्सव काळात दररोज संध्याकाळी महाआरती पार पडेल. त्यासोबत कीर्तन, भजन, नवदुर्गा सन्मान सोहळा, पाककला व रांगोळी सजावट स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. अष्टमीला होम-हवन व विधीवत पूजा होणार असून दसऱ्यादिवशी सासनकाठी सिमोल्लंघन सोहळा पार पडेल.
कोजागिरी पौर्णिमेला हळदी-कुंकू समारंभ व महिलांसाठी खास कार्यक्रम होणार असून जेष्ठ नागरिकांचा मेळावा व मार्गदर्शनपर व्याख्यानेही आयोजित केली आहेत. ‘आहारातून आरोग्याकडे’ या विषयावर डॉ. अंजली राजवाडे यांचे व्याख्यान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमात शाहीर श्रीकांत रेणके (पुणे), हलगीवादक श्री. योगेश रेणके, ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी), धीरशांतीदास (ईस्कॉन पुणे), डॉ. अंजली राजवाडे, तसेच स्थानिक सामाजिक संस्था, मंडळे व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उत्सवाचा समारोप
२ ऑक्टोबर रोजी दसरा सिमोल्लंघन, तर ६ ऑक्टोबर कोजागिरी  पौर्णिमेनिमित्त महाआरती व दुधवाटप करून या धार्मिक सोहळ्याचा समारोप होईल.
संपूर्ण महोत्सव काळात शिरवळ ग्रामस्थ व समिती सदस्यांचे सक्रीय सहकार्य लाभणार असून, या नवरात्र महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!