म्हसोबाचीवाडी येथे बस थांब्याचे उद्घाटन ; ग्रामस्थांच्या सोयीसाठी महत्त्वाचे पाऊल.!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

इंदापूर(दि.५):-म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथील चांदगुडे वस्तीवर आज दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी नवीन बस थांब्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या बस स्टॉपच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य मा. हनुमंत नाना बंडगर यांची होती. त्यांच्या हस्ते फलकाचे पूजन करून नारळ फोडण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य दादा वणवे, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य व मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यामध्ये पंकज चांदगुडे, तुकाराम चांदगुडे, हरिचंद्र चांदगुडे, सुनील चांदगुडे, दत्तात्रय चांदगुडे, सचिन चांदगुडे, धनसिंग चांदगुडे, शामराव चांदगुडे, चंद्रकांत चांदगुडे, गोपाळ गोरे (मामा), रघुनाथ दाभाडे (उद्योजक), अमोल पवार, शिवतेज पवार, शालेय समिती अध्यक्ष संदीप पवार, तंटामुक्ती अध्यक्ष लालासो साळुंके, प्रकाश चांदगुडे, करण चांदगुडे, चेअरमन अनिकेत झेंडे आदींचा समावेश होता.

या बस थांब्याच्या स्थापनेसाठी विशेष प्रयत्न राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष श्री. संदीप चांदगुडे यांनी केले. त्यांनी बारामती आगार प्रमुख घोगरे साहेब यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नातून अखेर बस स्टॉपची मंजुरी मिळून काम पूर्णत्वास गेले.

कार्यक्रमाच्या शेवटी बारामती-निरगुडे मार्गावरील बसने येथे थांबून बसचालक व वाहकांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे म्हसोबाचीवाडी व परिसरातील नागरिकांना प्रवासासाठी अधिक सुरक्षित व सुलभ सुविधा मिळणार आहे. ग्रामस्थांनी एकमुखाने समाधान व्यक्त करत पुढील विकास कामांसाठी एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!