जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा : खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या ह्या शेतकरी राजाच्या जीवावरती कोणते प्रताप करतील हे सांगताच येत नाही या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर केलेलं कांड आता समोर आलं आहे, सातारा जिल्हयातील पाचगणी येथील हाॅटेलमध्ये बारबालां समोर नाचणारे वीस जण हे सोलापूर, बारामती, सांगलीसह कर्नाटकातील असल्याचे पोलिसांच्या तपासात आता समोर आले आहे. खत विक्रेत्या दुकानदारांनी खतविक्रीमध्ये चांगली कमाई करून दिल्याने त्या संबंधित आसणाऱ्या कंपनीने त्यांना पाचगणी येथील हाॅटेल मध्ये साग्रसंगीत पार्टी दिली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.पाचगणी येथील हिराबाग हाॅटेलमध्ये रात्री ९ वाजताच्या सुमारास पाचगणी पोलिसांनी छापा टाकला. असता त्यावेळी १२ बारबाला ह्या बीभत्सपणे नृत्य करताना आढळल्या तर त्यांच्यासमोर काहीजण डान्स करत आसताना आढळले.
या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे सर्वजण सोलापूर, सांगली, बारामती तसेच कर्नाटकातील खतविक्रेते आहेत. विक्रमी खत विकून कंपनीला मोठा लाभ मिळवून दिल्याच्या बदल्यात कंपनीने त्यांना चक्क बारबालांचा नृत्य कार्यक्रम आयोजित करून दिल्याचे आता तपासातून पुढे आले आहे.दरम्यान, गेल्यावर्षी सुद्धा पाचगणी पोलिसांनी अशाच पद्धतीने एका हाॅटेल वर छापा टाकला होता. त्यावेळी सुद्धा बारबालां समोर नाचणारे याच जिल्ह्यातील होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
स्वतःची नावं लपविण्यासाठी पोलिसांकडे केली याचना..
आपण बारबाला समोर नाचताना पकडले गेलो, हे कोणाला समजू नये. तसेच आपली नावे वर्तमानपत्रांमध्ये येऊ नयेत, यासाठी संबंधित खत विक्रेत्यांनी पोलिसांकडे याचना केली होती. आमचे कुटुंब उद्ध्वस्त होईल, असे एक खत विक्रेता पोलिसांना म्हणत होता.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह