जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :- ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आता घरबसल्या एटीएममधून प्रायव्हेडंट फंडाचे पैसे काढता येणार आहेत. मे , जून महिन्यापासून कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड मिळणार आहे.
प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. कर्मचारी हा ईपीएफओचे सदस्य असतात. ईपीएफओनं मोठी घोषणा केली आहे. ईपीएफओ लवकरच पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड तयार करण्यात येणार आहे. त्याचसोबत मोबाईल ॲप सुद्धा लाँच करणार आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ईपीएफओ लवकरच एटीएम कार्ड लाँच करणार आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी हे एटीएम कार्ड वापरले जाणार आहे. याचसोबत मोबाईल ॲपचा वापर करू शकतात. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे मोबाईल ॲप आणि डेबिट कार्ड हे मे किंवा जून पर्यंत सुरु केले जाईल.
ईपीएफओ २.० आयटी प्रणाली अपग्रेड केली जाईल. ईपीएफओ ३.० मे किंवा जून २०२५ पर्यंत लाँच केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना बँकिंग सेवा मिळू शकणार आहे. यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने यापुढे पीएफचे पैसे काढू शकणार आहे.कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आता बँकिंग सुविधा मिळणार आहे. कोणत्याही ठिकाणावरुन म्हणजे एटीएममधून ही सुविधा उपलब्ध होईल, या खात्री करण्यासाठी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेत चर्चा सुरु आहे. ही नवीन सुविधा लागू झाल्यावर ईपीएफओ सदस्य एटीएम कार्ड वापरु शकणार आहेत.
पैसे काढण्याची मर्यादा किती असणार ?
ईपीएफओ कर्मचारी आता लवकरच एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे काढू शकणार आहे. परंतु संपूर्ण पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत. पैसे काढण्यासाठी काही मर्यादा लागू केल्या जाणार आहेत.मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ईपीएफओ सदस्यांसाठी मोबाईल बँकिंग ॲप करणार लॉन्च
मोबाईल बँकिंग ॲप हे ईपीएफ खाते धारकांसाठी तयार केले जाणार आहे. या ॲप मध्ये तुम्ही पेन्शन, पीएफ, मासिक योगदान याबाबत सर्व माहिती पाहू शकतात. तुम्ही बँकेच्या ॲपवर सर्व माहिती यापुढे पाहू शकणार आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह