रेशन दुकानात धान्याच्या होणाऱ्या , काळ्याबाजाराला बसणार लगाम ; राज्यसरकारचा महत्वपुर्ण निर्णय.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

पुणे :- रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आता समोर आली आहे. खरंतर राज्यातील बहुतांश रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. त्यामुळे राज्य सरकारच्या अन्नपुरवठा विभाकडून सदरचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या याच धान्याचा काळाबाजार  रोखण्यासाठी अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून ठोस अशा उपाययोजना केल्या जात आहेत.यासाठी एसएमएस गेटवे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे आता रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानात धान्य पोहोचले की लगेचच मोबाईलवर मेसेज जाणार आहे तसेच लाभार्थ्यांनी धान्य भरल्यानंतर सुद्धा एक मेसेज पोहचणार आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या बारा अंकी रेशनकार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करण्यात यावा असे अवाहन अन्नपुरवठा विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना करण्यात आलं आहे.
या नवीन मोबाईल एसएमएस प्रणालीमुळे आता रेशन कार्ड लाभार्थी धारकांना रेशन दुकानात धान्य पोहोचले की लगेचच मेसेज जाणार आहे तसेच लाभार्थ्यानी धान्य भरल्यानंतर सुद्धा एक मेसेज पोहचणार आहे. रेशन दुकानांवर धान्य आल्याचा व दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज या नवीन येणाऱ्या प्रणालीमुळे संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे. त्यामुळं धान्याचा होणारा काळाबाजार रोखण्यास या नवीन प्रणालीमुळे मदतचं होणार आहे.
रेशन दुकानांवर अन्नपुरवठा विभागाकडून धान्य पोहच झाल्यानंतरचा व दुकानावरून लाभार्यानी धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाइलवर येणार आहे. यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्याच्या काळाबाजारावरती मोठ्या प्रमाणात अंकुश लागणार असा विश्वास सरकारच्या अन्नपुरवठा विभागाकडून आता व्यक्त होत आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai