जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
शिरवळ:- सातारा जिल्ह्यातील शिंदेवाडी (शिरवळ )जवळील आठवले फार्मच्या ५० एकर जागेत भव्य दिव्य असे कृष्णा विश्व विद्यापीठ कराड यांच्या मार्फत नवीन कृष्णा मेडिकल कॉलेजचा भूमिपूजन समारंभ दिनांक २२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजून ११ मिनिटांनी माननीय डॉक्टर सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ उत्तरा सुरेश भोसले यांच्या शुभहस्ते तसेच भाजप आमदार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ गौरवी भोसले यांच्याप्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तसेच या कार्यक्रमाला निमंत्रक म्हणून माननीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा कुलपतींचे प्रमुख सल्लागार कृष्णा विद्यापीठ कराड ,माननीय डॉक्टर प्रवीण शिंगारे प्रधान सल्लागार शैक्षणिक व मानांकन कृष्णा विश्व विद्यापीठ कराड ,माननीय श्री विनायक भोसले सदस्य व्यवस्थापन मंडळ कृष्णा विश्व विद्यापीठ कराड ,माननीय डॉक्टर नीलम मिश्रा कुलगुरू कृष्णा विश्व विद्यापीठ कराड ,तसेच माननीय श्री दिलीप पाटील सदस्य व्यवस्थापन मंडळ कृष्णा विश्व विद्यापीठ कराड यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारे कृष्णा मेडिकल कॉलेजचा भूमिपूजन समारंभ सोहळा पार पडत असल्याने सर्व शिरवळ पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे शिरवळ व शिरवळ पंचक्रोशीत अद्यावत असे नामांकीत हॉस्पिटल नसल्याकारणानं उपचारासाठी एक तर पुणे किंवा सातारा येथे जावं लागत आहे त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा हा वाया जात आहे तसेच पुण्यातील नवले हॉस्पिटल व भारती विद्यापीठ यांच्या धर्तीवर या कृष्णा मेडिकल कॉलेजची निर्मिती होणार असल्यानं त्यामध्ये उपाचारासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच हे मेडिकल कॉलेज या भागात होणार असल्याने येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे तसेच हे मेडिकल कॉलेज दोन ते तीन वर्षात चालू होईल असा प्रयत्न कृष्णा विश्व विद्यापीठच्या व्यवस्थापन मंडळाचा राहणार आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 224