डाळज–कळस–वालचंदनगर रस्त्याला अखेर गती; रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
मुंबई | दि.२: इंदापूर तालुक्यातील डाळज ते कळस–वालचंदनगर (राज्य महामार्ग ९९) या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाली असून, रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सदर रस्ता तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. परिणामी, परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. दळणवळणाची समस्या गंभीर बनल्याने स्थानिक स्तरावर सातत्याने आंदोलने व मागण्या होत होत्या.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग व वालचंदनगर कंपनी यांच्यात समन्वय साधत प्रश्न मार्गी लावण्यात आला. स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले.
मंत्र्यांच्या सूचनेनंतर संबंधित विभागाने काम तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेतली असून, लवकरच या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz4 Ai
error: Content is protected !!