महिला व बालकल्याण सभापतीपदी अंकिता पाटील यांची निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे, ता.२ : पुणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापतीपदी अंकिता पाटील यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेतील निवड प्रक्रियेत त्यांनी बहुमत मिळवत ही जबाबदारी स्वीकारली.
महिला व बालकल्याण विभाग हा जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच बालकांच्या आरोग्य, शिक्षण आणि पोषणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पार्श्वभूमीवर अंकिताताई पाटील यांच्या निवडीकडे विशेष अपेक्षेने पाहिले जात आहे. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेवा, महिला बचत गटांचे बळकटीकरण आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या ठोस उपाययोजना राबवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडीनंतर बोलताना अंकिता पाटील यांनी सांगितले की, “महिला व बालकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर राहील. पोषण, शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी प्रभावी काम केले जाईल.”
दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात महिला व बालकल्याण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!