भिगवण-शेटफळगढेत राष्ट्रवादीत धुसफूस ; महिला तिकिटावरून बंडाची ठिणगी!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अनेक इच्छुकांमुळे सस्पेन्स टोकाला; अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस — जातीय समीकरणे सांभाळताना पक्ष नेत्यांची तारांबळ

भिगवण, ता.१९ | पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना भिगवण-शेटफळगढे गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या बंडाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. महिलांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग राखीव झालेल्या या गटात इच्छुक महिला उमेदवारांची रांग लागल्याने पक्ष नेतृत्वाची चांगलीच कोंडी झाली आहे.

भिगवण-शेटफळगढे गटात एकूण १६ गावे असून सुमारे ४१,९९० मतदार आहेत. या गटासाठी राष्ट्रवादीकडून पाच ते सात महिला उमेदवार रिंगणात असल्याने अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. भिगवणमधून माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव व माजी सरपंच हेमा माडगे यांच्यात थेट स्पर्धा रंगली आहे. मदनवाडी गावातून माजी पंचायत सदस्या मेघना बंडगर, सोनाली बंडगर, सारिका बंडगर तसेच विद्यमान सरपंच अश्विनी बंडगर यांनी प्रचारयंत्रणा सुरू केली आहे.

याशिवाय अनेक कार्यकर्ते व अनुभवी नेते अनुष्का भरणे यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी करत आहेत. त्यामुळे जातीय समीकरणे, गावनिहाय प्रभाव व संघटनात्मक ताकद यांचा समतोल साधताना पक्ष नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

तिकीट न मिळाल्यास काही इच्छुक उमेदवार भाजपच्या वाटेवर जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आधीच काहींनी भाजपकडील नेत्यांशी संपर्क साधून मुलाखती दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत संभाव्य बंड अपरिहार्य मानले जात आहे.

दरम्यान, भाजपमध्ये इच्छुक महिला उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. कोमल तेजस देवकाते-बंडगर, सुषमा दादा सलगर, अमृता आप्पा गायकवाड, प्राजक्ता सचिन वाघ, शैलजा विजय गायकवाड यांच्यासह शेटफळगढे गणातूनही इच्छुकांची यादी तयार आहे.

हर्षवर्धन पाटील गटातून मीनाक्षी संपत बंडगर जिल्हा परिषद उमेदवारीसाठी इच्छुक असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांची युती झाल्याने समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.

एकीकडे अर्ज भरण्याची मुदत संपत आली असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उमेदवार निश्चित न झाल्याने भिगवण-शेटफळगढे गटातील राजकारण तापले आहे. आता अंतिम तिकिट कोणाच्या पदरात पडते आणि कोण भाजपकडे वळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!