म्हसोबावाडी शाळेचा तालुकास्तरावर डंका ; आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक पुरस्कार व क्रीडा, गुणवत्ता उपक्रमांत अव्वल कामगिरी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३

इंदापूर, ता.१३:- इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हसोबावाडी ही उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, तर बेडूक उडी (लहानगट) या स्पर्धेत आदिराज अमोल चांदगुडे याने तृतीय क्रमांक मिळवून म्हसोबावाडी शाळेचे नाव पहिल्या तीन क्रमांकांत आणले आहे.

       आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याने          ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना मान्यवर

शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच आदर्श गुणवंत पुरस्कार सन २०२४–२०२५ अंतर्गत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बबिता महादेव पाठक यांना तालुकास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, तर सौ. चंदा संजय वणवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापिका व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच श्री. राजेंद्र राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अमोल बबन चांदगुडे, उपाध्यक्ष सौ. तृप्ती संदीप पवार यांच्यासह सर्व सहकारी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमास श्री. लालासो साळुंके, श्री. संदीप चांदगुडे, श्रीमती माधवी शेटे, श्री. हौशीराम चांदगुडे गुरुजी, श्री. सचिन चांदगुडे, श्री. मच्छिंद्र पवार, श्री. डी. डी. पवार, श्री. गणेश खंडाळे, श्री. प्रमोद खंडाळे, श्री. तुषार तावरे, सौ. रेश्म कालिदास चांदगुडे, सौ. गीता थोरवे, सौ. राणी चांदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीचा गौरव केला व पुढील काळातही असेच यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!