म्हसोबावाडी जिल्हा परिषद शाळेत ‘आनंदी बाजार’ उपक्रम ; विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.१३ :- म्हसोबावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना नफा–तोटा, खरेदी–विक्री व व्यापाराची प्रत्यक्ष माहिती मिळावी, या उद्देशाने ‘आनंदी बाजार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच श्री. राजेंद्र काका राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमोल बबन चांदगुडे, उपाध्यक्ष सौ. तृप्ती संदीप पवार तसेच समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
संक्रांतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी विविध वस्तू बाजारात मांडल्या. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या व निवडलेल्या वस्तूंना पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खरेदीसाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग व गावकरी उपस्थित राहिल्याने आनंदी बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. लालासो साळुंके, श्री. सचिन चांदगुडे, श्री. मच्छिंद्र पवार, श्री.हौशीराम चांदगुडे तसेच शिक्षक वर्गातील  श्रीमती माधवी शेटे, सौ. गीता थोरवे, सौ. राणी चांदगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका श्रीमती बबिता पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सौ. सुनिता बोरावके, श्रीमती पुष्पा काटकर, श्री. संजय वणवे, सौ. चंदा वणवे, श्री. ज्ञानेश्वर वणवे, श्री. ऋतुराज साळी सर यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानासोबतच आत्मविश्वास, संवादकौशल्य व आर्थिक शिस्तीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!