ग्रामदैवताच्या विवाह सोहळ्याने ; म्हसोबावाडी गावात भक्तीचा माहोल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्युज नेटवर्क
इंदापूर, ता.२२: म्हसोबावाडी, ता. इंदापूर येथील पाडव्यापासून सुरू झालेल्या म्हसोबावाडी गावचे ग्रामदैवत श्री यशवंतराय देवस्थानच्या पारंपरिक यात्रेचा प्रमुख सोहळा असलेला यशवंतराय विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. सकाळी ठिक १० वाजता मंगलमय वातावरणात या सोहळ्याची सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भक्तांच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात देवाचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली.
विवाह सोहळ्याला परिसरातील तसेच दूरदूरच्या गावांमधून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे यावेळी पहावयास मिळाले. देवाचा प्रतीकात्मक विवाह सोहळा पारंपरिक रीतीरिवाजांनी पार पाडण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने गावात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते. “यशवंतरायाचं चांगभलं” च्या गजरात, आणि तरुणांच्या व महिलांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि देवस्थान समितीच्या नियोजनामुळे विवाह सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सोयीस्कर पद्धतीने पार पडला. यात्रेच्या निमित्ताने गावात विविध धार्मिक कार्यक्रम, त्यामध्ये निलेशकुमार आहिरेकर सह रुपाली पुणेकर आणि पारंपरिक कुस्त्यांच्या मैदानाचेही आयोजन करण्यात आले आसल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे यात्रेच्या काळात म्हसोबावाडी गावात  उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळणार आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool
error: Content is protected !!