जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, दि. १० ऑक्टोबर — भ्रष्टाचाराविरोधात जनतेला जागं करण्यासाठी ॲन्टी करप्शन ब्युरो, पुणे घटक मैदानात उतरला आहे. “ॲन्टी करप्शन ब्युरो आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण पुणे जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमादरम्यान ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी ठरलेल्या वेळापत्रकानुसार शासकीय गेस्टहाऊसवर नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्या वेळी लाच मागणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी नोंदवून तातडीची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद मोर यांनी दिली.
⚖️ लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करा, कारवाईची खात्री!
ॲन्टी करप्शन ब्युरोकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट हे शासकीय कामासाठी कायदेशीर फीव्यतिरिक्त लाच मागत असल्यास, नागरिकांनी थेट ब्युरोच्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार द्यावी.
तक्रार नोंद होताच पुढील कार्यवाही तत्काळ केली जाणार आहे. तसेच या उपक्रमात नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे.
📅 जनजागृती अभियानाचे वेळापत्रक
सोमवार, १३ ऑक्टोबर — सासवड, जेजुरी, निरा
मंगळवार, १४ ऑक्टोबर — वडगाव मावळ, लोणावळा, खेड, चाकण
बुधवार, १५ ऑक्टोबर — बारामती, मोरगाव, वाघोली, शिक्रापूर, शिरूर
गुरुवार, १६ ऑक्टोबर — आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव, मंचर, भिगवण, इंदापुर, लोणी काळभोर, दौंड, यवत, भोर, राजगड, वेल्हा, पिरंगुट, पौड
👮♂️ अधिकारी व संपर्क क्रमांक
स.पो.आ. भारती मोरे — 9870156586
स.पो.आ. निता मिसाळ — 9822214414
स.पो.आ. सतीश वाळके — 8087002020
पोनि. शैलजा शिंदे — 7722011255
पोनि. आसावरी शेडगे — 8425808058
पोनि. सुहास हट्टेकर — 9881873330
पोनि. अविनाश घरबुडे — 9860667770
पोनि. खंडेराय रंजवे — 9923486428
पोनि. प्रसाद लोणारे — 9923444998
☎️ तक्रारीसाठी संपर्क साधा
📞 ॲन्टी करप्शन ब्युरो, पुणे कार्यालय: 020-26122134 / 26132802 / 26050423 / 9403781064
📱 व्हॉट्सॲप: 9403781064 (पुणे), 9930997700 (मुंबई)
📧 ई-मेल: dyspacbpune@mahapolice.gov.in
🌐 वेबसाईट: www.acbmaharashtra.gov.in
📲 ऑनलाईन ॲप: www.acbmaharashtra.net.in
पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी सर्व नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे —
“लाच मागणारा कोणताही अधिकारी असो, त्याची तक्रार नक्की करा; ब्युरो तातडीने कारवाई करेल!”
भ्रष्टाचारविरोधी रणशिंग पुन्हा एकदा फुंकले गेले आहे.
पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आता पुढाकार घ्यावा,
लाचखोरांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे!
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह










