कोऱ्हाळे बुद्रुक येथे गौरीच्या आगमनाला पारंपारिक सजावटीचा जोड.!!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
बारामती, ता.२ : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील सावंत वस्तीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात गौरीचे आगमन झाले. गावातील यादव कुटुंबाच्या वस्तीवर पारंपरिक पद्धतीने गौरीचे पूजन आयोजन करण्यात आले होते.
सुधीर पोपटराव यादव यांच्या घरी देवीचे आगमन झाल्यानंतर सौ. शैलजा सचिन यादव, शोभा सुधीर यादव आणि ऋतुजा पडवळ यांनी मनापासून परिश्रम घेऊन आकर्षक सजावट साकारली. निसर्गरम्य पार्श्वभूमी, रंगीबेरंगी फुलांची आरास आणि गौरीच्या मूर्तीची पारंपरिक सजावट यामुळे वस्तीवर धार्मिक वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते.
या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत केलेली कलात्मक मांडणी. प्रत्येक घटकात भक्तीभाव आणि सृजनशीलतेचे दर्शन घडत होते. वस्तीवरील महिलांनी या सजावटीचे विशेष कौतुक केले. देवीच्या पूजेसाठी आलेल्या पाहुण्यांनीही आरास पाहून समाधान व्यक्त केले.
गौरीच्या आगमनामुळे वस्तीवर आनंदाचे वातावरण पसरले असून दररोज महिला व पुरुष भक्त मोठ्या श्रद्धेने पूजनात सहभागी होत आहेत. सामूहिक प्रार्थना, आरतीमुळे वस्तीवर भक्तिमय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या माध्यमातून यादव कुटुंबाने गौरी पूजनाची परंपरा जपतानाचं एकोपा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवला आहे.
Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें

error: Content is protected !!